Nagpur News : बनावट नोटांचा ऑनलाईन ‘बाजार’, फसगत होण्याची शक्यता; मनोरंजनाच्या नावावर सर्रास विक्री

वर्षापासून ऑनलाईन फसवणूक प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. सायबर ठगबाज याचा पुरेपूर वापर करीत आहेत.
Online market for fake notes selling entertainment crime nagpur police
Online market for fake notes selling entertainment crime nagpur policeSakal
Updated on

- अखिलेश गणवीर

नागपूर : ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून काय विकल्या जाईल याचा काही नेम नाही. आघाडीच्या ऑनलाइन विक्री वेबसाइटवर बनावट नोटा विकल्या जात आहे. विक्री करताना वेबसाइटवर बनावट नोट (फेक करन्सी) असा उल्लेख जरी असला तरी त्या हुबेहुब दिसतात. लोहमार्ग पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रवाशाकडून पाचशे रुपयांची बनावट नोट जप्त केल्यानंतर त्या ऑनलाईन खरेदी केलेल्या आहेत का? याबद्दल शोध घेतला जात आहे.

काही वर्षापासून ऑनलाईन फसवणूक प्रकरणात सातत्याने वाढ होत आहे. सायबर ठगबाज याचा पुरेपूर वापर करीत आहेत. इकॉमर्स साईटवर भारतीय चलनाच्या दहा रुपयांपासून तर पाचशे रुपयांच्या नोटा विक्रीला आहेत. भारतीय नोटांचा रंग, चिन्ह व इतर सर्वच डिझाईन हुबेहूब आहे. त्यामुळे प्रथम दर्शनी त्या खऱ्याच वाटतात.

मात्र या नोटांवर मनोरंजन करिता वापर होत असल्याच्या उल्लेख आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी याचा वापर करीत असल्याचे वेबसाईटवर नमुद आहे. मात्र, फसवणूक करणाऱ्या अशा नोटांचा वापर करून त्यात आणखी बदल करून त्या वापरात आणू शकतात.

त्यामुळे अशा बनावटी नोटांमुळे फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारात नकली नोटांचे जाळे नकली नोटा बाजारात चलनात आणल्या जात असल्याच्या विविध घटना उजेडात येऊ लागल्या आहे. सरकारकडून नकली नोटा ओळखण्याबाबत जनजागृती केली जाते. परंतु, नागरिक घाईगडबडीत व्यवहार करताना नोटा निरखून फारसे पाहत नाही. नंतर मात्र हा प्रकार लक्षात येतो. तोपर्यंत त्यांची फसगत झालेली असते.

७० हजाराच्या बनावट नोटा जप्त

नागपूर लोहमार्ग पोलिसांनी काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रवाशाकडून पाचशे रुपयाची नकली नोट जप्त केली होती. त्याची अधिक चौकशी केली असता नकली नोटा बाजारात चलनात आणणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांच्या हाती लागली होती. पश्चिम बंगालची ही टोळी असून त्यांच्याकडून ७० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्या नोटा कोठून आल्यात त्याबद्दल शोध घेतला जात आहे.

नकली नोटा चलनात आणणाऱ्या सात लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७० हजार रुपयांचा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्या कुठून आणल्या याचा शोध घेण्यात येत आहेत.

- मनीषा काशिद,पोलिस निरीक्षक- लोहमार्ग पोलिस, नागपूर

मुळात भारतीय चलनाच्या नोटा नकली असो किंवा इतर त्या ऑनलाईन विक्रीला उपलब्धच होऊ नये. ग्राहक आणि विक्रेता असा थेट संपर्क असल्याने वेबसाइट वस्तुंची खरी पडताळणी करीत नाही. ते एक व्यासपीठ आहे. त्यामुळे व्यवहार करताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी. पोलिसांनी सुद्धा काय विक्री होत असते यावर लक्ष घालायला हवे.

- ॲड्. महेंद्र लिमये, सायबरतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.