Online Shopping : ऑनलाइन विक्री करणाऱ्यांनो सावधान

फेसबुक, इन्टाग्रामवर ऑर्डर मागवून फसवणूक
online shopping
online shopping
Updated on

नागपूर : खरेदीसाठी ऑनलाइनकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याने अनेक छोट्या दुकानदारांनीही ऑनलाइनचा वापर करीत, फेसबुक आणि इन्टाग्रामसारख्या सोशल मिडियावर आपल्या जाहिराती टाकल्या आहेत. मात्र, या जाहिरातीवर सायबर चोरटे दुकानदारांना फोन करीत, खोटी ऑर्डर देत, त्यांची फसवणूक करताना दिसून येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

सध्या दिवाळीनिमित्त नागरिकांचा खरेदीवर जोर आहे. मोठमोठ्या कंपन्यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री सुरू केली. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसला. त्यातून व्यापाऱ्यांनीही शक्कल लढवित, आपले उत्पादन घराघरात पोहचविण्यासाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून जाहिरात टाकणे सुरू केले.

यामध्ये घरी तयार केलेल्या वस्तूंपासून तर इतर सर्वच उत्पादनांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांना प्रतिसादही मिळत आहे. मात्र, आता सायबर चोरट्यांची त्यांच्यावर नजर असून व्यापाऱ्यांना गंडा घालण्यासाठी सायबर चोरटे सक्रीय झाले आहेत.

सायबर चोरटे या जाहिरातीच्या अनुषंगाने दुकानदारांना फोन करुन मोठी ऑर्डर देण्याचे आमिष दाखवितात. यानंतर स्वतःच्या खात्याचे डिटेल्स देत, त्याद्वारे दुकानदारांचा विश्‍वास संपादन करतात. यानंतर त्यासाठी एक लिंक पाठवून दुकानदारांची माहिती घेतात. ती मिळताच, ते दुकानदारांच्या खात्यातील पैसे उडवित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे दुकानदारांनी अशी ऑर्डर घेताना सांभाळून व्यवहार करण्याची गरज आहे.

हे टाळा

  • - कुठलीही लिंक उघडू नका.

  • - संपूर्ण विचारणा केल्याशिवाय आपली माहिती शेअर करू नका.

  • - ओटीपी शेअर करू नका.

  • - याबाबत पोलिसांना कळवा.

अशी होते फसवणूक

मधुरिमा बिडकर यांच्याद्वारे‘मधुरिमा केक बेकर’ या नावाने इन्टाग्रामवर एक जाहिरात पोस्ट करण्यात आली होती. या जाहिरातीवरुन काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीद्वारे केकची ऑर्डर काढण्यात आली. त्याने आर्मी कॅन्टीनमध्ये कार्यरत असल्याची माहिती देत काही सहकाऱ्यांचे वाढदिवस असल्याने केक लागतील असे सांगितले. याशिवाय ते केक कशा पद्धतीचे हवे याबाबत माहिती दिली.

त्यामुळे ही मोठी ऑर्डर असल्याने त्यांनी आपल्या पतीला सांगितले. त्यावरून त्यांना शंका येत त्यांनी पैशाबाबत काही विचारणा केली काय? असे विचारले. मात्र, ते सांगितले नाही, अशी माहिती मधुरिमा बिडकर यांनी दिली. त्यातून शंका आली. त्यामुळे त्यांनी विचारणा केली असता, सायबरच्या माध्यमातून फसवणुकीतून तो कॉल असल्याची माहिती समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.