मेडिकलमध्ये कोरोना लसीचे अवघे ४०० डोस; कोव्हॅक्सिन संपण्याच्या मार्गावर

मेडिकलमध्ये कोरोना लसीचे अवघे ४०० डोस; कोव्हॅक्सिन संपण्याच्या मार्गावर
Pix_Pratik
Updated on

नागपूर : केंद्राकडून लसपुरवठा (Vaccination Program) योग्य प्रमाणात होत नसल्याने लसीकरणाला थांबा लागला आहे. मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लसींचा तुटवडा असून, आज मेडिकलला (Government Medical College) केवळ ४०० डोस देण्यात आले. विशेष असे की, ४०० डोस २४ तासांत संपतात. (only 400 doses of Covaxin remaining in Government medical hospital Nagpur)

मेडिकलमध्ये कोरोना लसीचे अवघे ४०० डोस; कोव्हॅक्सिन संपण्याच्या मार्गावर
धक्कादायक! विद्यार्थिनीने दिली चक्क ICU मधून परीक्षा; विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष

मेडिकलमध्ये आतापर्यंत १५ हजार जणांचे लसीकरण झाले. येथील लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी येतात. मात्र, महिन्याभरापासून लसीचा अनियमित पुरवठा होत असल्याने पहिला डोस देणे बंद करण्यात आले. दर दिवसाला लस मिळेल का, अशी मागणी मेडिकल प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मेडिकलला लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, महापालिकेकडून लसपुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे मेडिकल प्रशासनाने थेट आरोग्य विभागाकडे मागणी केली. मनोरुग्णालयातून ८०० डोस उसनवारीवर आणले. आज पुन्हा एकदा ४०० डोस मेडिकलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. तेदेखील संपण्याच्या मार्गावर आहेत.

मेडिकलमध्ये कोरोना लसीचे अवघे ४०० डोस; कोव्हॅक्सिन संपण्याच्या मार्गावर
पोलिसांवर दगडफेक प्रकरण : टोलीतील आणखी नऊ जणांना अटक

मेडिकलला द्या पाच हजार लसी

मेडिकलमधील केंद्रासाठी एकाच वेळी कमीत कमी ५ हजार लसी उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी मागणी विविध संस्थांतर्फे करण्यात आली आहे. मेडिकलमध्ये येणाऱ्या गरिबांना लस तुटवड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. लस महोत्सव साजरा करण्यापेक्षा लसींचा योग्य प्रमाणात पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी दक्षिण नागपूर विकास आघाडीचे संयोजक अनिकेत कुत्तरमारे यांनी केली आहे.

(only 400 doses of Covaxin remaining in Government medical hospital Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()