नागपूर : नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक परिसरातून सोलरचा एक प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने पुन्हा एकदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. विदर्भात पंतप्रधान मोदी येत असल्याने विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच तापवला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावत खोटे बोलणे आणि नरेटिव्ह सेट करणे हाच एकमेव विरोधकांचा उद्योग असल्याची टीका केली आहे.