नागपूर : अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा उपयोग करीत घरातील विजेची उपकरणे गरज नसताना विशिष्ट वेळ निश्चित करून बंद वा सुरू करण्याचे तंत्र विकसित केले आहे. विशेष म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वच तंत्रज्ञानापेक्षा अतिशय स्वस्तात उपलब्ध करून दिला आहे.
एका युनिटच्या वापरातून ०.०६२ किलोग्रॅम कार्बनडाय ऑक्साइडची निर्मिती होत असल्याचा अहवाल ‘कार्बन न्युट्रल चॅरिटेबल फंड’ या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेने दिला आहे. त्यामुळे विजेचा अपव्यय हा मानवासाठी घातक असल्याचे दिसून येते. त्यामुळे विजेचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. अनेकदा जाहिराती आणि घरगुती वापरात मोठ्या प्रमाणात विजेचा अपव्यय होताना दिसून येतो. त्यामुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसते. त्यामुळे त्याची बचत काळाची गरज आहे.
शहरात अनेक होर्डिंग्जवर लागलेले लाईट्स बंद करण्यासाठी एक नियमित एक माणूस ठेवावा लागतो. त्याचे दुर्लक्ष झाल्यास लाईट्स तसेच सुरू राहताना दिसून येतात. त्यामुळे त्यासाठी कुणावर तरी अवलंबून राहावे लागते. अशाच प्रकारे घरी दुर्लक्ष झाल्यास अनेकदा गीझर आणि इतर विजेवर चालणाऱ्या वस्तू तशाच सुरू राहतात. त्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.
हा अपव्यय थांबविण्यासाठी यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशनच्या प्राध्यापक असलेले योगेश काळे यांनी ‘ओटोटायमा‘ हे यंत्र तयार केले. या यंत्राच्या माध्यमातून विशिष्ट वेळ ठरवून शहरातील होर्डिंग्जवर लागलेले लाईट्स सकाळ होताच बंद करता येणे शक्य होणार आहे.
इतकेच नव्हे तर घरातील गिझर, एसी, गेटवर असलेले लाइट ही विशिष्ट वेळेत बंद करता येणे शक्य होईल. शिवाय मोबाईलच्या क्लिकवरही ते बंद वा सुरू करता येणे शक्य होईल. त्यामुळे विजेचा अपव्यय होण्याचे टाळता येणे शक्य होणार आहे. योगेशने हे तंत्रज्ञान बाजारातील इतर तंत्रज्ञानापेक्षा अतिशय स्वस्त आणि अधिक लोड कनेक्ट करू शकणारे आहे हे विशेष.
वीज कशी वाचेल यावर अधिक भर
तंत्रज्ञान स्वस्तात लोकांना मिळावे यासाठी ‘ओटोटायमा’ हे सोल्यूशन बेस उत्पादन तयार करीत त्यातून वीज कशी वाचेल यावर अधिक भर दिला. आज अनेक ठिकाणी ‘ओटोटायमा’ हे यंत्र लावण्यात आले असून त्याचा फायदा होताना दिसून येत आहे.
- योगेश काळे,
प्राध्यापक, यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.