डेंगीचा प्रकोप कायम; शहरात ५०० तर ग्रामीण भागात ५६५ रुग्ण

Dengue
Dengueesakal
Updated on

नागपूर : जिल्ह्यावर डेंगीचे संकट कोसळले आहे. डेंगीचे जिल्ह्यात एक हजार ६५ रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आठ दिवसांत सुमारे ४०० डेंगीग्रस्ताची नोंद झाली. तर मृत्यू विश्लेषण समितीची बैठक न झाल्यामुळे वाढलेल्या डेंगी मृत्यूवर शिक्कामोर्तब अद्याप झाले नसल्याची माहिती पुढे आली आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभाग गुंतला असल्याने डेंगीच्या उद्रेकाकडे या विभागाचे लक्ष गेले नाही. यामुळे अचानक डेंगीचे उद्रेक झाला. स्मार्ट सिटीचा दर्जा मिळालेल्या उपराजधानीत महापालिकेच्या आरोग्य विभागाने फवारणीचा काही परिसरात देखावा केला. मात्र, फवारणीची मोहीम थंडबस्त्यात गेली. यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या गतीने वाढली आहे.

५०० डेंगीग्रस्तांची नोंद नागपूर शहरात झाली आहे. ५६५ डेंगीग्रस्त नागपुरातील खेड्यात आढळले आहेत. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. विशेष असे की, पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली गोंदियात आढळलेल्या रुग्णांपेक्षा पाच पट रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळले आहेत. पूर्व विदर्भात डेंगीचे १ हजार ६६९ रुग्ण आढळले असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Dengue
नागपूरमधून दारूगोळ्याची रसद; पहिली खेप लष्कराकडे

लहान मुलांची संख्या अधिक

विशेष असे की मेडिकलमध्ये २० दिवसांमध्ये ४१० डेंगीग्रस्तांची नोंद झाली आहे. सध्या ७० पेक्षा अधिक डेंगीग्रस्त मेडिकलच्या वॉर्डांमध्ये दाखल आहेत. डेंगीच्या रुग्णांमुळे येथील दोन वॉर्ड हाऊसफुल्ल झाले आहेत. लहान मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

डेंगीचे रुग्ण

  • नागपूर शहर ः ५०० रुग्ण - ३ मृत्यू

  • नागपूर ग्रामीण ः५६५ रुग्ण - ३ मृत्यू

  • चंद्रपूर ः२७४ रुग्ण -१ मृत्यू

  • वर्धा ः १९६ - रुग्ण - १ मृत्यू

  • गोंदिया ः ९० रुग्ण - ० मृत्यू

  • भंडारा ः २३ - रुग्ण - १ मृत्यू

  • गडचिरोली ः२२ रुग्ण - ० मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.