Nagpur : 200 लाडक्या बहिणींशी ‘अशी ही बनवाबनवी’, स्वयंरोजगाराची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात, निधी नसल्याचे शासनाचे कारण

Nagpur : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे २०० महिलांची स्वयंरोजगार कर्ज प्रकरणे निधीअभावी प्रलंबित आहेत, ज्यामुळे त्या हताश झाल्या आहेत. सरकार महिना १५०० रुपये देत असताना, कर्ज योजनेतील अडचणींमुळे रोजगार मिळवणं कठीण होत आहे.
Over 200 women face despair as self-employment loan  nagpur
ladki bahinsakal
Updated on

नागपूर : रोजगार मिळत नसल्याने स्वयंरोजगार योजनेसाठी फॉर्म भरला, कागदपत्र जमा करताना दमछाक झाली, तरीही आशेने त्याचा पाठपुरावा केला. परंतु, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे कर्ज न मिळाल्याने या महिला हताश झाल्या आहेत. त्यांना शासनाकडे निधी नसल्याचे कारण देण्यात आले.

एकीकडे राज्य शासन लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना भेट देऊन ती रक्कम थेट बॅंकेत जमा करते. तर दुसरीकडे काही बहिणी स्वयंरोजगार करून पायावर उभे होण्यासोबतच इतराहांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, कर्जप्रकरणे प्रलंबित ठेऊन शासन आमच्यासारख्या बहिणींची थट्टा होत असल्याची खंत अर्ज करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली.

एक, दोन नव्हे तर दोन तब्बल २०० महिलांची प्रकरणे निधीअभावी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे पडून असल्याची माहिती आहे. महिलांना सक्षमीकरणाच्या वाटेवर चालण्यासाठी मदतीचा हात देणाऱ्या योजनांचा पाऊस केंद्र व राज्य शासनाने पाडला आहे.

मात्र, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास मंडळाकडून (एनएसएफडीसी) मिळणाऱ्या कर्जाची ही प्रकरणे थंडबस्त्यात आहेत. यात सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन योजनेअंतर्गत येणाऱ्या शंभर प्रकणांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू तसेच नोकरी मिळत नसल्याने स्वयंरोजगाराकडे वळण्याचे धाडस करणाऱ्या युवतींचे अर्ज यात प्रलंबित आहेत.

तरुणांना आश्‍वासनाचे गाजर

योजनेच्या अंमलबजावणीत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ एजन्सी म्हणून अर्ज भरण्यापासून तर तर एनएएसएफडीसीकडे प्रकरणे हस्तांतरित करण्याचे काम करते. एनएसएफडीसीकडे अनुसूचित जातीतील युवक-युवतींचे २०० तर याच धर्तीवर नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन योजनेतून सफाई कामगारांच्या मुलांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. या योजनेच्या लाभासाठी २०० युवक-युवतीनी अर्ज केले असून अशी एकूण ४०० कर्जप्रकरणे थंडबस्त्यात आहेत.

लाडक्या बहिणींना बिनशर्त भेट योजना राबवत असताना ज्या महिलांनी स्वयंरोजगरासाठी कर्जाचा अर्ज केला, त्यांचे कर्ज प्रकरण तत्काळ मंजूर करावे. कोट्यावधीचे कर्जबुडवे देश सोडून पळून जातात. त्यांच्याकडून वसुली केली जात नाही. मात्र गरिबांसाठी जाचक अटी लावून अशा कर्ज योजनेपासून त्यांना वंचित ठेवण्यात येते. निधी उपलब्ध करून दिला जात नाही.

-राजन वाघमारे, उपाध्यक्ष , आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲंड लिटरेचर, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.