नागपूर : अकरा मार्च २०२० मध्ये पहिला कोरोनाबाधित (Nagpur Corona Update) आढळला. यानंतर नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या विषाणूचा (Coronavirus) प्रकोप झाला. मृत्यूची त्सुनामी आली. या वर्षभराहून अधिकच्या काळात ४ लाख ५६ हजार ३८० जणांना कोरोनाने विळख्यात घेतले. मात्र याच कालावधीत ४ लाख ४ हजार ७०२ जणांनी कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकली. (over 4 lac patients defeat corona in Nagpur till now)
८ हजार ३२५ जणांना आतापर्यंत कोरोनाच्या लढाईत जीव गमवावा लागला आहे. बुधवारी (ता.१२) कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ५ हजार ७०८ आहे. तर नव्याने बाधित झालेल्यांची संख्या २ हजार ५३२ आहे. ६७ जणांचा मात्र मागील २४ तासांत कोरोनाने बळी घेतला.
नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. तर बाधितांची संख्याही तीव्र गतीने ओसरत आहे. मृतांच्याही संख्येत घट दिसून येत आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल २०२१ मध्ये तांडव घालणाऱ्या कोरोनाला प्रशासनासह नागरिकांच्या प्रयत्नातून पायबंद घातला जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी कोरोना बाधितांची संख्या ही कोरोनामुक्तांच्या तुलनेत दुप्पट नोंदविली जात होती. परंतु मागील बारा दिवसांपासून सातत्याने कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे.
ही समाधानाची बाब आहे. त्यामुळेच आज घडीला शहरातील विविध रुग्णालयांमध्ये रुग्णांकरिता मोठ्या संख्येने खाटाही उपलब्ध होत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील २ हजार ६४१ व ग्रामीणमधील ३ हजार ०६७ अशा ५ हजार ७०८ लोकांनी कोरोनाला हरवले. यामुळे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्क्यांवर पोहचले आहे. बुधवारला दिवसभरात झालेल्या ६७ दुर्दैवी मृत्यूत शहरातील ३५, ग्रामीणमधील १९ व जिल्ह्याबाहेरील १३ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ८३२५ वर आली आहे.
जिल्ह्यात ४३ हजार कोरोनाबाधित
सद्यस्थितीत शहरात २२११० व ग्रामीणमध्ये २१२४३ असे ४३ हजार ३५३ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ३४ हजार ६६ जणांना कुठलेही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. ते सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले मेयो, मेडिकल, एम्ससह इतर शासकीय व खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.
पॉझिटिव्हीटी दर १५ टक्क्यांहून खाली
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ओसरली आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी दरही खाली येत आहे. २० दिवसांपूर्वी ३२ टक्क्यांवर पोहचलेला पॉझिटिव्हीटी दर आता १५ टक्क्यांवर आला. आजही शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील पॉझिटिव्हीटी दर जास्त आहे. बुधवारी शहरात १२ हजार ४१० तर ग्रामीणमध्ये ४ हजार ७५१ अशा जिल्ह्यात १७ हजार १६१ चाचण्या झाल्या. यापैकी १४.७६ टक्के म्हणजेच २हजार ५३२ जणांना बाधा झाली. यात शहरातील १ हजार ३१९, ग्रामीणमधील १हजार २०० व जिल्ह्याबाहेरील १३ जणांचा समावेश आहे.
(over 4 lac patients defeat corona in Nagpur till now)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.