दिलासादायक! उपराजधानीत पंधरा दिवसांत तब्बल ४३ हजार जणांची कोरोनावर मात

दिलासादायक! उपराजधानीत पंधरा दिवसांत तब्बल ४३ हजार जणांची कोरोनावर मात
Updated on

नागपूर : कोरोनाच्या (Coronavirus) भयानक स्थितीतून आज जिल्हा सावरत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन आठवड्यात ४३ हजारांवर बाधित कोरोनामुक्त झाले. ग्रामीण भागातही बाधित (Corona in Rural) व कोरोनाबळींचा आलेख खाली येत असल्याने दिलासा मिळाला. आज नव्याने (Nagpur Corona Update) ३६५ बाधित आढळून आले असून यात ग्रामीणमधील केवळ १४६ जणांचा समावेश आहे. कोरोनाबळींची संख्याही शहराच्या तुलनेत कमी असल्याने ग्रामीण भागातही कोरोनावर नियंत्रण आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत ११ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. (over 43 thousands patients defeat corona in 15 days in Nagpur)

दिलासादायक! उपराजधानीत पंधरा दिवसांत तब्बल ४३ हजार जणांची कोरोनावर मात
मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दारावर चिकटवलं निवेदन

गेल्या महिन्यांभरात कोरोनावर नियंत्रणासाठी सर्व प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याने निराश झालेल्या प्रशासनाला आता कुठे दिलासा मिळत आहे. कोरोना बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण आज ९६.४२ पर्यंत पोहोचले असून आतापर्यंतची चेहऱ्यावर समाधान आणणारी टक्केवारी आहे. आज जिल्ह्यात १ हजार ३३३ बाधित कोरोनामुक्त झाले.

आतापर्यंत एकूण ४ लाख ५६ हजार ५७९ जणांनी कोरोनावर मात केली. गेल्या दोन आठवड्यात तब्बल ४३ हजार ५०७ जणांनी कोरोनावर मात करीत बाधितांमध्ये सकारात्मकतेची पेरणी केली. दरम्यान आज जिल्ह्यात नवे ३६५ बाधित आढळून आले. यात शहरातील २१६ तर ग्रामीण भागातील १४६ जणांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४ लाख ७३ हजार ५३७ पर्यंत पोहोचली. यात अर्थातच शहरातील सर्वाधिक ३ लाख ३० हजार ४२२ जण आहेत.

ग्रामीण भागातील १ लाख ४१ हजार ५७४ बाधित आहेत. गेल्या २४ तासांत ११ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. यात शहरातील ६ तर ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. तिघे जण शहराबाहेरचे आहेत. आतापर्यंत कोरोना एकूण ८ हजार ८६२ जणांचा मृत्यू झाला असून शहरातील ५ हजार २२७ दुर्देवी लोकांचा समावेश आहे. ग्रामीण भागातही २ हजार २७९ नागरिकांचा मृत्यू झाला. शहराबाहेरील १ हजार ३५९ जणांनी शहरात उपचारादरम्यान प्राण सोडला.

दिलासादायक! उपराजधानीत पंधरा दिवसांत तब्बल ४३ हजार जणांची कोरोनावर मात
राज्यात एक जूननंतर मिळणार कपाशीची बियाणे; मान्सूनपूर्व पेरणीला ब्रेक

३० हजारांवर सक्रीय रुग्ण घटले

आज जिल्ह्यात केवळ ८ हजार ९३ सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या पंधरा दिवसांत ३० हजार ९६३ सक्रीय रुग्ण घटले. १४ मे रोजी जिल्ह्यात ३९ हजार ५६ सक्रीय रुग्णांची नोंद होती. ती आज ९हजार ९३ वर आली. सक्रीय रुग्णांत सातत्याने घट होत असल्यानेही आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे.

(over 43 thousands patients defeat corona in 15 days in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()