किडनी युनिटमध्ये ऑक्सिजन गळती

मेडिकलः डायलिसिसवरील चार रुग्णांना हलविल्याने धोका टळला
Oxygen leakage into the kidney unit Nagpur medical
Oxygen leakage into the kidney unit Nagpur medical
Updated on

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) किडनी डायलिसिस (किडनी युनिट) सुरू असलेल्या विभागात असलेल्या ऑक्सिजन पाइपलाइनचा व्हॉल्व बंद करताना गळती झाली. यामुळे किडनी डायलिसिसवरील रुग्णांना लिफ्टद्वारे तातडीने दुसऱ्या वॉर्डात हलवण्यात आले. मेडिकल प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रुग्णांच्या जिवावर बेतणारे संकट टळले. कोणताही धोका झाला नसला तरी रात्रीपासून ही गळती सुरू असल्याची माहिती आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत मेडिकलमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारे तीन प्लांट लावण्यात आले आहेत. मात्र अनेक वॉर्डात ऑक्सिजन पुरवठा करणारी पाइपलाइन जीर्ण झाली आहे. येथील किडनी युनिटमधील पाइपलाइन जीर्ण झाली असल्यामुळे येथील जोडणी निघाली. ऑक्सिजन वाहून नेणारा पाइप कॉपरचा असतो. यामुळे पाइप जोडताना तो गरम करण्याची गरज असते. याला बराच वेळ लागणार असल्यामुळे येथील रुग्णांना वॉर्ड क्रमांक ५१ मध्ये हलवण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेडिकलच्या किडनी युनिटमध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पाइपलाइनमध्ये एक की बसवलेली असते, ही व्हॉल्व बंद करताना ही की निघाली. यामुळे ऑक्सिजन गळती सुरू झाली. ऑक्सिजनवर असलेल्या डायलिसिसच्या रुग्णांना तत्काळ जम्बो सिलिंडर लावण्यात आले. चार रुग्णांना हलवण्यात आले असल्याची माहिती आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी शटडाउन करावे लागणार आहे. मंगळवारी शटडाऊन करून दुरुस्ती करण्यात येणार आहे.

सहा महिन्यातील दुसरी घटना

यापूर्वी ११ जानेवारी २०२२ रोजी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक १ मधील ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लांटजवळच्या पाइपलाइनला गळती लागली होती. त्यावेळी ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे ही गळती निदर्शनास आली होती. त्यावेळी ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना इतर वॉर्डात हलविण्यात आले होते. यामुळेच मोठा धोका टळला होता.

किडनी डायलिसिस युनिटमधील ऑक्सिजन पाइपलाइनचा व्हॉल्व बंद करताना की निघाली. यामुळे ऑक्सिजन गळती सुरू झाली. लिकेज सुरू झाले तरी याचा रुग्णांवर कोणताही परिणाम झाला नाही. रुग्णांना वॉर्ड क्रमांक ५१ मध्ये हलवण्यात आले. कोणताही धोका झाला नाही.

- डॉ. अतुल राजकोंडावार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.