Paduka Darshan Sohala 2024 : आनंदी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे ‘श्री फॅमिली गाईड’

तणावग्रस्त, चिंतित, व्यथित जीवन जगण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलोच नाहीत; तर सुखी-आनंदी जीवनावर प्रत्येकाचा हक्क आहे. तो मिळवून देण्याची गुरुकिल्ली म्हणजे ‘सकाळ’चा ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रम आहे, अशा भावना विविध आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या.
Paduka Darshan sohala 2024
Paduka Darshan sohala 2024sakal
Updated on

नागपूर : तणावग्रस्त, चिंतित, व्यथित जीवन जगण्यासाठी आपण या पृथ्वीवर आलोच नाहीत; तर सुखी-आनंदी जीवनावर प्रत्येकाचा हक्क आहे. तो मिळवून देण्याची गुरुकिल्ली म्हणजे ‘सकाळ’चा ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रम आहे, अशा भावना विविध आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या. तसेच संतुलित जीवनासाठी प्रत्येकाने तो स्वीकारावा, असे आवाहनही उपस्थितांनी केले.

‘सकाळ’च्या ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रमांतर्गत २६ आणि २७ मार्च रोजी नवी मुंबईच्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा आयोजित केला आहे. या महोत्सवात १८ संत-महंतांच्या पादुका दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येईल. त्यानिमित्ताने ‘सकाळ’ कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सहभागी साधकांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी गजानननगर, नरसाळा येथील गजानन मंदिर देवस्थानाचे सचिव वासुदेव नागपुरे, कोषाध्यक्ष मुरलीधर आसई, अखिल दिगंबर संस्थेचे राष्ट्रीय सचिव नितीन नखाते, पुलक मंच परिवार महावीर वॉर्ड मंत्री अमोल भुसारी तसेच श्री सैतावळ जैन संघटन मंडळ युवा शाखाध्यक्ष नीरज पळसापुरे उपस्थित होते. ‘सकाळ’चा ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रम जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविणारा असून, समाधानी, शांतिदायी जीवनासाठी मार्गदर्शक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Paduka Darshan sohala 2024
Paduka Darshan : पादुकादर्शनात समाजस्वास्थ्याचा नवा पैलू

आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक असलेला ‘सकाळ’चा ‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रम जीवनात सकारात्मकता आणणारा आहे. ग्रस्त आणि त्रस्त जीवनशैलीतून मुक्ती मिळविण्याचा तो मार्ग आहे.

-नितीन नखाते, राष्ट्रीय सचिव, अखिल दिगंबर संस्था

निरोगी, स्वस्थ आणि सेवाभावी जीवन मिळविण्यासाठी ‘सकाळ’चा ‘श्री फॅमिली गाईड’ अतिशय उपयुक्त आहे. २६ आणि २७ मार्च रोजी मुंबईच्या वाशी येथी आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा म्हणजे भक्तांसाठी पर्वणीच असल्याने मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले पाहिजे.

-वासुदेव नागपुरे, सचिव गजानन देवस्थान, गजानननगर, नरसाळा

दर्शनाचा दुर्मीळ योग

नवी मुंबईच्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये २६ आणि २७ मार्च रोजी आयोजित ‘श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा’ गुरुभक्तांसाठी दर्शनाचा दुर्मीळ योग आहे. कारण या ठिकाणी एकाच वेळी तब्बल १८ संत-महंतांच्या पादुका दर्शनाचा लाभ घेता येईल. आवर्जून उपस्थिती दर्शवून या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.