Nagpur News : जगभरातील १६ देशांमधील ३०० तज्ज्ञांची मांदियाळी; पहिली जागतिक लिंबूवर्गीय परिषद उद्यापासून

जगातील पहिल्या लिंबूवर्गीय परिषदेच्या आयोजनाचा बहुमान भारताला मिळाला
panel of 300 experts from 16 countries around world First World Citrus Conference from tomorrow
panel of 300 experts from 16 countries around world First World Citrus Conference from tomorrowSakal
Updated on

नागपूर : लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये जागतिक स्तरावर उपलब्ध तंत्रज्ञानाविषयी संवाद, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि त्यासाठी सामंजस्य करार करण्याच्या उद्देशाने जागतिक स्तरावर नागपुरात पहिल्यांदाच लिंबूवर्गीय (सिट्रस) परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद २८ ते ३० रामदास पेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे होणार असल्याची माहिती, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

जगातील पहिल्या लिंबूवर्गीय परिषदेच्या आयोजनाचा बहुमान भारताला मिळाला आहे. परिषदेचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महाव्यवस्थापक डॉ. सुधांशू पाठक यांच्या अध्यक्षतेखाली होईल. पाहूणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पीक संरक्षण शाखेचे उपसंचालक डॉ. टी. आर. शर्मा, कृषीशास्त्रज्ञ व निवड समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, डॉ. व्ही. बी. पटेल, प्रकाश पाटील, व्ही. के. बर्नावाल, डॉ. एम. कृष्णा रेड्डी, आशियाई डेव्हल्पमेंट बॅंकेचे सुनील पारेख व डॉ. प्रभात कुमार यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेला भारतातील २५० प्रतिनिधींसह जगभरातील एकूण १६ देशांचे ३०० तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. यात भारतीय कृषी संशोधन संस्था, केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, एशिया पॅसिफिक असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च, थायलंड आणि कोरियन सोसायटी फॉर सिट्रस यांच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. घोष यांनी सांगितले. पत्रपरिषदेला ए. के. डे, डॉ. एस. एस. रॉय व डॉ. संगीता भट्टाचार्य उपस्थित होते.

रोपवाटिका संवर्धनाला प्रोत्साहन

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था रोपवाटिका संवर्धनाला प्रोत्साहन देत असल्याचे सांगून, डॉ. घोष म्हणाले, संस्थेने नेहमीच चांगल्या प्रतीच्या रोपांचे उत्पादन व पुरवठ्यावर भर दिलेला आहे. रोपांची वार्षिक मागणी १.७ कोटी असताना संस्था केवळ तीन लाख रोपांचेच उत्पादन व पुरवठा करू शकत आहे.

गेल्या १८ वर्षांत ५५ लाख रोपे शेतकऱ्यांना लागवडीसाठी देण्यात आली आहेत. त्यामध्ये ७० टक्‍के एकट्या महाराष्ट्रात असून, उर्वरित ३० टक्‍के १९ राज्यांमध्ये आहेत. संस्थेने रोप निर्मितीसाठी देशातील १२ रोपवाटिकाधारकांशी करार केला असून, त्या माध्यमातून ३० लाख दर्जेदार रोपांचे उत्पादन होत असल्याचे घोष यांनी यावेळी सांगितले. याशिवाय संस्थेला तीन नवे वाण विकसित करण्यात यश आल्याचेही डॉ. घोष यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com