नागपूर : सीटी स्कॅनसाठी 'डाय' विकत आणतात रुग्ण

ज्यांचे हातावर पोट आणि बीपीएल यादीत नाव आहे त्यांच्यावरही मेडिकलमध्ये मोफत उपचार होत नाही
CT Scan
CT Scansakal
Updated on

नागपूर : गरीब रुग्णांसाठी मेडिकल हाच आधार आहे कारण दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) रुग्णांवर येथे मोफत उपचार होतात. मात्र, सीटी स्कॅनसाठी वापरायचा ‘डाय’ बीपीएल रुग्णांना विकत आणावा लागतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी ‘डाय’ विकत आणा असे डॉक्टरने सांगितल्यानंतर सत्तरीतील ज्येष्ठ नागरिक पैसे नसल्याने आल्या पावली परत गेले. उपेक्षेची वेदना सहन करीत ‘राहू द्या बिमारी, मरणालेच जवळ करीन’ अशी प्रतिक्रिया नोंदवून मोतीराम निघून गेले.

CT Scan
ऐन हंगामात मासळीवर संक्रात; हर्णे बंदरातील नौकांना खाड्यांचा आधार

मागील तीन महिन्यांपासून ‘डाय’ची प्रशासनाने खरेदी केला नाही. मेडिकलमध्ये कॅज्युअल्टी, बाह्यरुग्ण विभाग किंवा ऑपरेशन थिएटर येथे औषध, सर्जिकल साहित्यासह हातमोज्यांचा तुटवडा आहे. कोणतीही वस्तू स्थानिक प्रशासनाला खरेदी करता येत नाही, अशी अवस्था २०१७ पासून राज्यभरात झाली आहे.ज्यांचे हातावर पोट आणि बीपीएल यादीत नाव आहे त्यांच्यावरही मेडिकलमध्ये मोफत उपचार होत नाहीत. बाळंतपणासाठी पत्नीला घेऊन आल्यानंतर शस्त्रक्रियेचे साहित्य आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकाच्या हाती भली मोठी यादी हाती दिली जाते. यामुळे पालकमंत्र्यांनी मेडिकल, मेयो, सुपर स्पेशॅलिटीत गरीब रुग्णांवर मोफत उपचार होतात काय हे बघावे, अशी मागणी होत आहे.

CT Scan
'मला आठवत नाही', चांदीवाल आयोगाच्या उलट तपासणीत देशमुखांनी प्रश्न टाळला?

सोळाशे कुठून आणू जी

भंडारा येथील मोतीराम ठवकर हे ईएनटी विभागात तपासणीसाठी आले. सीटी स्कॅन सांगण्यात आले. रेडिओलॉजी विभागात गेल्यानंतर त्यांना सोळाशे रुपये भरण्यास सांगितले. भंडाऱ्यातून उसनवारीवर पैसे घेऊन मोतीराम मेडिकलमध्ये आले. घरी पत्नी प्रभाबाई आजारी आहे. पैसे नसल्याने त्या उपचारापासून वंचित आहेत. त्यांची जमेल तेवढी सेवा मोतीराम करतात. मात्र, मुखाचा त्रास झाल्याने त्यांनी उसनवारी करून मेडिकलमध्ये उपचारासाठी आले. जाण्यायेण्याचे तिनशे रुपये भीक मागून आणल्यानंतर येथी कुठून भरुजी पैसे, अशी व्यथा त्यांनी मांडली. मोतीराम यांना कोणीही नातेवाईक नाही. मुलगी होती ती दोन वर्षांपूर्वी गावात आलेल्या पुरात वाहून गेली. वयाच्या सत्तरीत पोटासाठी मोतीराम शेतमजुरी करतात. दुपारी मोतीरामला योगेश नासरे हा आरोग्य दूत भेटला. आता योगेश त्यांना मदत करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.