Nagpur : बिल न चुकता देता; मुबलक पाणी कधी देणार?

जुनी अजनीतील महिलांचा संतप्त सवाल; २४ बाय ७ पाणी योजना नावालाच
pay bills abundant water scheme
pay bills abundant water schemesakal
Updated on

जुनी अजनी : महानगरपालिका व ओसीडब्ल्यूच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या २४ तास ७ दिवस अर्थात २४ बाय ७ पाणी योजनेचे वास्तव पाहायचे असेल तर लक्ष्मीनगर झोनच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये अवश्य भेट द्या. दिवसभर पाणी देण्याचा गाजावाजा असताना प्रत्यक्षात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत एका तास पाणी सोडले जाते.

पाण्याची धार इतकी लहान असते की केवळ एक-दीड गुंडच पाणी मिळते. नळाचे बिल तर बरोबर देता; पण तहान भागेल एवढे पाणी कधी देणार, असा संतप्त सवाल जुनी अजनीतील महिलांनी केला. ‘इथे प्यालेच पाणी मिळत नाही तं वापराच्या पाण्याची बातच सोडा, दिवसभर वाट पाहूनही आमाले फक्त एक ते दीड गुंड पाणी भेटते.

त्यात तहान भागवावी का काय करावं? हे समजत नाही. उन्हाळ्यात भयंकर त्रास होतो. टँकरच्या पाण्याशिवाय आमच्याजवळ दुसरा चारा नाही. तक्रार करून भी त्यावर कोणी काम कराले तयार नाही. आम्ही कोटी जाव?’ अशा संतप्त भावना येथील रहिवासी निर्मला मडावी यांनी व्यक्त केल्या.

pay bills abundant water scheme
Nagpur : खेळाला जावं तर पायाला दगडं लागतात, काटे रूततात बच्चेकंपनीने मांडली कैफियत!

नळ दुरुस्ती करताना तो उंचावर आहे, असा बहाणा करत महानगरपालिकेचे कर्मचारी पाहिजे त्या ठिकाणी खड्डा न खोदता दुसरीकडेच खड्डा खोदतात. आत्तापर्यंत असे चार मोठाले खड्डे खोदून झाले. परंतु काम काही झाले नाही. एवढेच नाही तर खड्डा खोदल्यानंतर तो बुजविण्याचे औदार्यही दाखवत नाही.

अनुचित घटना होऊ नये म्हणून आम्हीच आमचा पैसा खर्च करून तो खड्डा बुजवून टाकतो. खुल्या खड्ड्यांमुळे वस्तीत खेळणाऱ्या मुलांच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे अनेकदा आम्हालाच हातात फावडा-कुदळ घेऊन खड्डे बुजण्याचे काम करावे लागते. पाण्याचे बिल नियमित भरतो; तरी पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. आमची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. टँकरने पाणी आले तर ते साठविण्यासाठी मोठे भांडे नाहीत, अशा शब्दांत नागरिकांनी आपली नाराजी बोलून दाखविली.

दूषित पाण्यामुळे जीवाला धोका, मुलांमध्ये बळावले आजार

या परिसरातील काही भागात नळाला दूषित पाणी येते. तसेच पाण्यात कृमीही आढळतात. त्यामुळे शुद्ध पाणी येईपर्यंत वाट पाहावी लागते. सुरुवातीचे पाणी फेकावे लागते. त्यानंतर वापरायचे पाणी भरावे लागते. पाणी भरून होत नाही तोच नळ जातो.

मनपा कार्यालयात वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात येते. दूषित पाण्याने आमच्या जीवाला धोका आहे. लहान मुलांमध्ये साथीचे आजार वाढले आहेत. पाण्यामुळे एखाद्याचा जीव गेला तरच प्रशासनाला जाग येईल काय? असा प्रश्न चेतना मानकर यांनी उपस्थित केला.

pay bills abundant water scheme
Nagpur : नागपूरात पाऊस व ढगाळी वातावरण; हवामान विभागाचा आणखी दोन दिवस यलो अलर्ट

एकीकडे दिवसभर लबालब,

दुसरीकडे ठणठणाट

परिसरातील नारिकांचा प्रशासनाविरोधात प्रचंड रोष दिसून आला. नाव न छापण्याच्या अटीवर एकाने सांगितले की, वर्षानुवर्षांपासून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिसरातील पाण्याची समस्या एवढी बिकट आहे की, याचा परिणाम दैनंदिन कामावर होतो. घर वरच्या माळ्यावर असल्याने महिला पाणी भरू शकत नाही.

त्यामुळे बरेचदा घाईघाईने ऑफिसमधून येऊन पाणी भरावे लागते. छत्रपतीनगर, विवेकानंदनगर तसेच आजूबाजूच्या परिसरात दिवसभर नळ असते. मग समर्थनगर परिसरात असा दुजाभाव का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाण्यासाठी टिल्लू पंप लावल्यास मनपाद्वारे दंड आकारला जातो. मग आम्ही हवेवर जगावे काय? असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

एकेकाळी सर्वांना पाणी पुरविणारी विहीर झाली गटार

प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत येणाऱ्या चुनाभट्टी भागातील सार्वजनिक विहिरीची दुर्दशा झाली आहे. उन्हाळ्यात जलस्रोत आटण्याचे प्रमाण वाढत असताना नेहमीच पाणी असलेल्या या विहिरीचे गटारात रूपांतर झाले आहे. पाइपलाइनमध्ये असलेल्या दोषामुळे गटारीचे पाणी विहिरीत झिरपते. त्यामुळे विहीर घाण झाली आहे.

विहिरीची स्वच्छता होत नसल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना डासांचा त्रास होतो. येथे राहणाऱ्या फरिदा पठाण सांगतात की, विहिरीचे पाणी दूषित झाल्याने डासांचा प्रकोप वाढला आहे. नियमित स्वच्छता होत नाही. विहीर स्वच्छ केल्यास येथील पाणी परिसरातील नागरिकांच्या उपयोगात येऊ शकते. विहिरीत गप्पी मासे पैदास केंद्र तयार करण्यात आले होते; मात्र विहिरीच्या दुर्दशेमुळे हा उपक्रमसुद्धा थंडावल्याची वास्तविकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.