PCB Percentage : अभियांत्रिकी, फार्मसीसाठी चुरस ;पीसीएम, पीसीबीच्या पर्सेंटाईलमध्ये वाढ,३७ विद्यार्थ्यांना पूर्ण गुण

राज्यातील अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या निकालात लक्षणीय वाढ झाली. निकालात विद्यार्थ्यांचे गुण वाढून पर्सेंटाईलमध्ये वाढ झाली आहे.
PCB Percentage
PCB Percentagesakal
Updated on

नागपूर : राज्यातील अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीच्या निकालात लक्षणीय वाढ झाली. निकालात विद्यार्थ्यांचे गुण वाढून पर्सेंटाईलमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही शाखेमध्ये प्रवेशासाठी यंदा चुरस वाढणार असल्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याच्या सीईटी सेलद्वारे एमएचटी-सीईटीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. गेल्यावर्षी पीसीबी आणि पीसीएम गटात २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल होते.

मात्र, यावर्षी १०० पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३७ वर आहे. याशिवाय त्या खालोखाल ९० ते ९९.९९ पर्सेंटाईल मिळविणाऱ्यांची संख्या ६९ हजार १४७ आहे. ६० ते ६९.९९ पर्सेंटाईल मिळविणारे जवळपास दोन लाखांवर विद्यार्थी आहेत. याशिवाय ५० च्या खाली पर्सेंटाईल मिळालेल्यांची संख्याही बरीच आहे. त्यामुळे अभियांत्रिकी आणि फार्मसीची चांगली महाविद्यालये मिळाविण्यासाठी यंदा चुरस बघायला मिळणार आहे. राज्यात अभियांत्रिकीच्या दीड लाखांवर तर फार्मसीच्या ४२ हजार ७९४ जागा आहेत.

जागांमध्ये वाढ

राज्यात स्वायत्त महाविद्यालयांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यांना जागांमध्ये वाढ करण्याचे अधिकार असल्याने काही स्वायत्त महाविद्यालयांनी हजारांच्या संख्येत जागा वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे, फार्मसी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये सहा हजारांची वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत झाली आहे. त्यामुळे निकाल आणि विद्यार्थी संख्या वाढली असली तरी विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांची धाकधूक वाढली आहे.

PCB Percentage
Nagpur News : व्यापारी मुलाच्या तणावात वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय ;नऊ सुपारी व्यापाऱ्यांना अटक,१८ जणांवर गुन्हा

पारंपरिक शाखांमध्येही गर्दी वाढणार

अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांची आयटी, कॉम्प्युटर सायन्स, सायबर सिक्युरिटी, मशिन लर्निंग, डेटा सायन्स आणि ‘एआय’सारख्या शाखांमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा असते. तुलनेत मेकॅनिकल, सिव्हिल आणि पारंपरिक शाखांकडे विद्यार्थी दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र, कट ऑफमध्ये वाढ झाल्याने याही शाखांमध्ये यंदा गर्दी वाढण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.