नागपूर
Pench Hot Air Balloon: पर्यटकांसाठी पर्वणी! पेंचच्या व्याघ्र प्रकल्पात 'हॉट एअर बलून', 'पॅरामोटरिंग सफारी', ‘कोलितमारा फ्लाइंग' सुरु
मध्य प्रदेशातील पेंचमधील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार
नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील कोलितमारा या अतिशय दुर्गम अशा ठिकाणी असलेल्या मिनाको इको-टुरिझम कॉम्प्लेक्समध्ये पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात उत्तम पर्यटनाचा आनंद लुटता यावा म्हणून फ्लाइंग कोलितमारा‘ या नावाने ॲडव्हेंचर स्पोर्ट्स' ला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याअंतर्गत कोलितमाराला भेट देणाऱ्या पर्यटकांना आता पॅरामोटरिंग आणि हॉट एअर बलून राईडचा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे.