Nagpur : पेंचमध्ये पानमांजर, गोरेवाड्यात रान म्हैस प्रजनन केंद्र; मुख्यमंत्र्याची वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज मान्यता

बैठकीत मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पानमांजर, नाशिक येथे गिधाड आणि गोरेवाडा येथे रान म्हैस, तनमोर यांचे प्रजनन केंद्र उभारण्यासंदर्भात विषय मांडला.
Pench National Park Panmanjar Buffalo breeding center in Gorewada Approval by cm eknath shinde wildlife board meeting
Pench National Park Panmanjar Buffalo breeding center in Gorewada Approval by cm eknath shinde wildlife board meeting Sakal
Updated on

नागपूर : राज्यात दुर्मिळ होत असलेल्या पानमांजर (ऑटर), गिधाड, तनमोर, रानम्हैस यांच्या प्रजनन केंद्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज मान्यता दिली. पेंच व्याघ्र प्रकल्पात पानमांजर आणि गोरेवाडा प्रकल्पात रान म्हैस प्रजनन केंद्र करण्यावर यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे पानमांजर प्रकल्प पेंचमध्ये होणार याचे भाकित ‘सकाळ’ने केले होते. त्यावर आज निर्णय झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.