Pench National Park : पेंच प्रकल्पाच्या पर्यटनाला पावसाळी सुटी;१ आक्टोबरपासून सुरू होणार,बफरमध्ये पावसाळी पर्यटन सुरू राहणार

राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पेंच व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठीची मॉन्सून सफारी येत्या एक जुलैपासून बंद होणार आहे.
Pench National Park
Pench National Parksakal
Updated on

नागपूर : राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पेंच व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठीची मॉन्सून सफारी येत्या एक जुलैपासून बंद होणार आहे. एक ऑक्टोबरनंतर नियमित सफारीला सुरुवात होणार आहे. उन्हाचा तडाखा वाढलेला असताना फेब्रुवारी ते मे या कालावधीत पेंच प्रकल्पात एक लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्रप्रकल्प बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते. पेंचमधील अनेक रस्ते मातीचे आहेत. सिल्लारी ते अंबाखोरी मार्ग फक्त डांबरी रस्त्याचा आहे. याशिवाय इतर मार्ग मातीचेच आहे. पावसाळ्यात वाहनांमध्ये रस्ते खराब होतात.

तसेच पर्यटकांचा जिवाला धोका होऊ शकतो. याशिवाय राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यात कोअर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. बफर झोनमधील काही प्रवेशद्वार पाऊस, रस्ते स्थिती व उपलब्धता बघून पर्यटनासाठी कमी-अधिक प्रमाणात खुले राहणार आहे. याशिवाय पवनी आणि नागलवाडी वन परिक्षेत्रातील काही मार्गावर पावसाळी पर्यटन करण्यात येणार आहे. नवेगाव-नागझिरा, बोर हे दोन्ही व्याघ्रप्रकल्प अंतर्गत कच्च्या रस्तांमुळे बंद तर मेळघाट अंशतः सुरू राहणार आहेत.

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉट बलून, पॅराग्लायडिंगसह विविध उपक्रम सुरू केले. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढत होता. त्यात यंदा सिल्लारी आणि खर्सापार प्रवेशद्वारातून पर्यटन करणाऱ्या पर्यटकांना हमखास वाघाचे दर्शन होत होते. वन विभागाने आकाशप्रेमीसाठी आकाश दर्शनाची विशेष सोय केलेली आहे. त्याचेही आकर्षण वाढलेले आहे. त्या आकर्षणानेही अनेकांनी यंदा पेंचला भेट दिलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.