सेवानिवृत्तीचे वेतन मृत्यूनंतर द्याल काय? निवृत्त कर्मचाऱ्यांची व्यथा

सेवानिवृत्तीच्या वेतनाचा लाभ मिळत नसल्यामुळे अनेक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी कर्ज काढले
Pension
PensionSakal
Updated on

नागपूर : शासकीय कार्यालयातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्तीच्या दिवशी त्याला सेवानिवृत्तीची (retired employee)देय रक्कम आणि निवृत्ती वेतन (pension)अदा करण्यासंदर्भातील पत्रासह सेवापुस्तिकेनुसार सर्व कार्यवाही पूर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले चतुर्थश्रेणी कर्मचारी निवृत्ती वेतन सुरू करावे यासाठी प्रशासनाकडे खेटा घालतात, मात्र त्यांची दखल घेतली जात नाही. यामुळे अखेर काही कर्मचाऱ्यांनी आमच्या मृत्यूनंतर सेवानिवृत्तीचे वेतन द्याल काय? असा सवाल विचारण्यास आला असून लवकरच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

Pension
राज्यात 41 टक्के मुलांना लसीकरण

सेवानिवृत्तीच्या वेतनाचा लाभ मिळत नसल्यामुळे अनेक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी कर्ज काढले आहे.मात्र व्याजाचे पैसे द्यायचे कुठून हा सवाल त्यांच्यापुढे आहे. अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जगणे कठिण झाले आहे. यापूर्वी जुलै २०१९ मध्ये कृष्णा धार्मिक हा चतुर्थश्रेणी कर्मचारी निवृत्तीवेतनासाठी दररोज मेयोत खेटा घालीत होता, परंतु त्याला निवृत्तीवेतन सुरू केले नाही, अखेर वेतनापूर्वीच दुर्दैवी कर्मचाऱ्याचे निधन झाले होते.त्यांच्या निधनानंतर त्यांना लाभ देण्याचे काम मेयो प्रशासनाने केले होते. हीच स्थिती यावेळी देखील आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभासाठी मेयो रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी, अधिष्ठाता यांच्याकडे वारंवार खेटा घालण्यात येत असून विनवणी करण्यात येते, परंतु दखलच घेतली जात नसल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.(Nagpur News)

Pension
भारत-रशियाच्या युद्धनौकांची कवायत

नियम सांगतो

सेवानिवृत्तीच्या सहा महिन्यांपूर्वी सेवा पुस्तिकेतील नोंदी पूर्ण करुन वेतन पडताळणी पथकाकडे पाठवण्याची गरज आहे. यानंतर लगेच त्यांना देय असलेली रक्कम तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी वेतन मिळावे अशी कार्यवाही करणे आवश्‍यक आहे. परंतु मेयोतील निवृत्त झालेल्या पंधरापेक्षा अधिक कर्मचारी अजूनही खेटा मारत आहेत, परंतु त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले नाही. मेयोचे प्रशासन विषयाला गंभीरपणे घेत नाही, यामुळे कर्मचाऱ्यावर ही पाळी आली असल्याची तक्रार कर्‍मचाऱ्यांनी केली आहे.

सेवानिवृत्तीचे लाभ कर्मचाऱ्यांना मिळवून देण्यासाठी चिरीमिरी द्यावी लागत असल्याची चर्चा आहे. चतुर्थश्रेणी कर्मचारी निवृत्तीनंतर कसे जगतात, याचा विचार प्रशासन करीत नाही. सेवानिवृत्तीच्या लाभाच्या प्रतिक्षेत मेयोतील बरेच कर्मचारी आहे. प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास यासंदर्भात संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे तसेच विद्यमान वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे तक्रार करण्यात येईल.

- सिद्धांत पाटील, आयटीसेल प्रमुख, वंचित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()