शववाहिनीच झाली तिरडीचे खांदेकरी; मृतदेह नेण्यास माणसं तयार होत नसल्याने उपाययोजना

शववाहिनीच झाली तिरडीचे खांदेकरी; मृतदेह नेण्यास माणसं तयार होत नसल्याने उपाययोजना
Updated on

हिंगणा (जि. नागपूर) : एमआयडीसी (Hingna MIDC) ही कामगार वसाहत. लोकसंख्या लाखाच्या घरात. दूरवर स्मशानभूमी (Crematorium). त्यातही गरिब कामगार...ही अडचण समजून समाजसेवक (Social Work) प्रेम रूपनारायण आणि संवेदना मंचचे अध्यक्ष बबनराव पडोळे, काही जागृत समाजसेवकांनी पुढाकार घेऊन एक शववाहिनी समाजासाठी अर्पण केली. कोरोनाकाळात आज हीच शववाहिनी तिरडीचे खांदेकरी झाली आहे. (People are not ready for taking dead corona patients to Crematorium in Nagpur district)

शववाहिनीच झाली तिरडीचे खांदेकरी; मृतदेह नेण्यास माणसं तयार होत नसल्याने उपाययोजना
बापरे! एकाच एकाच रात्रीत तब्बल ४ घरफोडी; अमरावतीत चोरट्यांचा प्रचंड धुमाकूळ

काही वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्ते प्रेम रुपनारायण यांना शववाहिनीची कल्पना स्मशानभूमीतच सूचली आणि त्यांनी शववाहिनी विकत घेतली. काही दिवसांनंतर गरजूंना सेवा देत असताना देखभाल दुरुस्तीचा खर्च झेपू न शकल्याने ती बंद पडलेल्या अवस्थेत होती.

ही स्थिती संवेदना मंचच्या लक्षात आली आणि तिला दुरुस्त करण्याचा पुढाकार समासेवक बबन पडोळे, उद्योजक विनोद ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. शववाहिनीला रस्त्यावर आणून सेवेसाठी सज्ज केले. आज कोरोनाकाळात माणसापासून माणूस दूर जात असताना मृतदेहाला स्मशानभूमीत नेण्यासाठी ‘माणसे’ मिळत नसताना तिरडीचे खांदेकरी ही शववाहिनी बनली आहे.

शववाहिनीच झाली तिरडीचे खांदेकरी; मृतदेह नेण्यास माणसं तयार होत नसल्याने उपाययोजना
ग्रामीण भागात फ्रंटलाइन वर्कर्सना विरोध; सहकार्य न केल्यास जिल्हा परिषदेचा कारवाईचा इशारा
या परिसरात शववाहिनी नसल्याने बाहेरून गरिबांना अधिक पैसे देऊन मागवावी लागत होती. म्हणून माझ्या मनात ही कल्पना आली. खर्च झेपू शकत नसल्याने ती ऊभी होती. पण संवेदना मंचाचे सहकारी बबनराव पडोळे, विनोद ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने हा उपक्रन कोरोनाकाळातही सुरू आहे.
-प्रेम रुपनारायण, बालाजी नगर, हिंगणा रोड, नागपूर

(People are not ready for taking dead corona patients to Crematorium in Nagpur district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.