नागपूर : राज्यात अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर (Petrol price hike) शंभर रूपयांवर यापूर्वीच पोहचले आहेत. त्यात आता उपराजधानी नागपुरचाही (Nagpur petrol price) समावेश झाला आहे. शुक्रवारी २५ पैशांनी वाढ होताच पेट्रोलने शंभरी गाठली आहे. कोरोनाच्या (Nagpur Corona Update) त्रासातून कशीबशी मुक्तता होत असताना आता महागाईचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. (Petrol price increased over 100 rupees in Nagpur)
महागाई वाढण्याची जी काही कारणे आहेत त्यात पेट्रोल आणि डिझेलचा वाटा सर्वात जास्त असतो. अगदी गावखेड्यांवरही याचा थेट परिणाम होतो. भाजीपाला वाहतुकीचे दर वाढणार असल्याने याचा थेट फटका शहरातील सामान्य नागरिकांन बसणार आहे. परिणामी फळे आणि भाजीपाला महागणार आहे.
गुरुवारपर्यंत पेट्रोलचे दर वाढत जाऊन ९९.७५ पैशांपर्यंत पोचले होते. शुक्रवारी त्यामध्ये आणखी ०.२५ पैशांची वाढ होऊन पेट्रोलने शतकी आकडा गाठला. विशेष म्हणजे पॉवर पेट्रोल यापूर्वीच १०० रुपयांच्या वर गेले आहे. आज पेट्रोलचे भाव १०० रुपये ५ पैसे इतके आहे. फेब्रुवारीनंतर मेमध्ये पुन्हा एकदा इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक स्तरावर लसीकरण मोहिमेसह अन्य कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.
त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपयाही कमजोर होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दररोज सकाळी सहाच्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात.पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीचा परिणाम सर्वांवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा निश्चितच फटका बसणार असल्याची जाणकारांनी माहिती दिली.
आता महागाई डोळ्यात पाणी आणणार
शहरवासीयांना गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाने खुप छळले आहे. हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. कित्येक कुटूंब उध्वस्त झाली. ऑक्सिजन सिलिंडर, रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी हजारो रूपये खर्च करावे लागले. औषधे वेळेवर न मिळाल्याने कित्येकांन प्राण गमवावे लागले. कोरोनाचे संकट कमी होत असताना आता महागाईच्या रुपात दुसरे संकट उभे ठाकले आहे. सामान्यांनी जगावे तरी कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
(Petrol price increased over 100 rupees in Nagpur)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.