Nagpur Police : फोटोग्राफर विनय पुणेकरची गोळ्या झाडून हत्या; चार महिन्यानंतर मारेकऱ्याला लुधियानातून अटक

२३ फेब्रुवारीला साक्षी ग्रोवरच्या मदतीने हेमंत शुक्लाने दुपारच्या सुमारास विनय पुणेकरची घरात शिरून हत्या केली होती.
Vinay Punekar Murder Case
Vinay Punekar Murder Caseesakal
Updated on
Summary

हेमंत शुक्ला स्वतः जिम ट्रेनर होता. त्याने इंदूरलाही जिम ट्रेनर म्हणून काम केले होते. तिथेच त्याची ओळ साक्षी ग्रोवरशी झाली होती.

नागपूर : नागपूर पोलिस ठाण्याच्या (Nagpur Police Station) हद्दीतील राजनगर येथे राहणाऱ्या फोटोग्राफर विनय ऊर्फ बबलू सॅम्युअल पुणेकर याची गोळ्या मारून हत्या (Vinay Punekar Murder Case) करीत, फरार झालेला मुख्य आरोपी हेमंत शुक्लाला सदर पोलिसांच्या पथकाने लुधियानातून (Ludhiana) काल बुधवारी (ता. २६) अटक केली. गेल्या चार महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

Vinay Punekar Murder Case
मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर बाणेर, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेल जमीनदोस्त; पुण्यात 19 ठिकाणी कारवाई

२३ फेब्रुवारीला साक्षी ग्रोवरच्या मदतीने हेमंत शुक्लाने दुपारच्या सुमारास विनय पुणेकरची घरात शिरून हत्या केली होती. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, तपास सुरू केला. तपासात साक्षी ग्रोवरचे नाव समोर आल्यावर पोलिसांनी तिला अटक केली. तिच्या व्हाट्सअॅप मॅसेजेसची तपासणी केली असता, प्रकरणात बरेच खुलासे झाले होते. त्यात घटनेच्या आदल्या दिवशी तो नागपुरात येऊन तिने त्याला स्वतः च्या घरी थांबवून घेत, विनयचे घर दाखविले होते.

Vinay Punekar Murder Case
कर्नाटकात काँग्रेसचं सरकार धोक्यात? 'या' पदावरून पक्षात गटबाजी, DK शिवकुमारांचा प्रभाव कमी करण्यासाठी डावपेच सुरू

त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास हेमंतने विनय पुणेकर यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर दोन गोळ्या चालवित खून केला. तेव्हापासून पोलिस हेमंत शुक्लाचा शोध घेत होती. त्यासाठी सदर पोलिस आणि गुन्हे शाखेने मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेशसह पंजाबमध्येही त्याचा शोध घेतला. मात्र, तो सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत होता. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोबाइल क्रमांकाचे लोकेशन काढून पोलिसांनी पंजाबच्या गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांशी संपर्क साधला. यावेळी लुधियाना पोलिसांनी त्याचा शोध घेत, काल (बुधवार) सकाळी त्याला अटक केली. ही माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक चिखलीकर यांना त्याला ताब्यात घेण्यासाठी पाठविले. आज रात्रीच्या सुमारास हेमंतला नागपुरात आणण्यात आले.

Vinay Punekar Murder Case
पुढच्या वर्षी शाहू जयंतीला आमदार म्हणून येणार, ही काळ्या दगडावरची रेघ; समरजीतसिंहांचे थेट मुश्रीफांनाच चॅलेंज?

जिम ट्रेनर म्हणून करीत होता काम

हेमंत शुक्ला स्वतः जिम ट्रेनर होता. त्याने इंदूरलाही जिम ट्रेनर म्हणून काम केले होते. तिथेच त्याची ओळ साक्षी ग्रोवरशी झाली होती. खून केल्यावर हेमंत शुक्ला विविध ठिकाणी जिम ट्रेनर म्हणून काम करीत होता. त्यातून तो पंजाबमध्ये लुधियानातही एका जिममध्ये काही दिवसांपासून ट्रेनर म्हणून काम करत होता. तपासात सदर पोलिस त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. यावेळी त्याच्या भावांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी तो सतना रेल्वे स्थानकावर भेटल्याची माहिती दिली. याशिवाय त्याला एक नवा क्रमांक देऊन त्यात रिचार्ज केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तो क्रमांक मिळत त्याचे लोकेशन तपासले. त्यात तो लुधियानात असल्याचे कळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.