मृत पेन्शनधारकच्या नावावर पेन्शनची उचल; गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

मृत पेन्शनधारकच्या नावावर पेन्शनची उचल; गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
Updated on

कामठी (जि. नागपूर) : मृत पेन्शनधारक (Deceased pensioner) महिलेच्या नावावर कुटुंबातील सदस्यांनी बँकेची दिशाभूल (Misleading the bank) करून दरमहा एटीएम कार्डद्वारे पेन्शनची उचल केल्याचा प्रकार जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. या प्रकरणात सहभागी असलेल्या कुटुंबीय सदस्य व अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यास जुनी कामठी पोलिसांतर्फे टाळाटाळ करीत पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप फिर्यादी नरेश चौकसे यांनी केला आहे. (Pick up the pension in the name of the deceased pension holder men)

मोदी पडाव कामठी रहिवासी व नरखेड ग्रामीण रुग्णालयातून अधिपरीचारिका पदावरून अल्कापती मधुकर जोशी नियत वयोमानानुसार ३१ डिसेंबर २००८ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर दरमहा येत असलेली पेन्शनची रक्कम ही एटीएम कार्डद्वारे उचल करीत होते. काही वर्षांनंतर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन २७ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले. याबाबत बँक अधिकाऱ्यांसह कोषागार विभागाला कुठलीही माहिती नसल्याने दर महिन्याला देण्यात येणारी पेन्शनही मृत पेन्शनधारक महिलेच्या बँक खात्यात पाठविणे सुरूच होते.

मृत पेन्शनधारकच्या नावावर पेन्शनची उचल; गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
कायद्यात सुधारणेची गरज; मराठा आरक्षण गेले, ओबीसी धोक्यात!

या महिलेचे कुटुंबीय सदस्य दर महिन्याला ही पेन्शनची रक्कम उचल करायचे. वास्तविकता पेन्शनधारकला दर वर्षी हयात असल्याचे प्रमाणपत्र संबंधित बँकेला सादर करायचे असते. मात्र तसे करण्यात आले नव्हते. उलट फेब्रुवारी २०१९ पासून मृत महिलेचा मुलगा सुभाष मधुकर जोशी व सून सपना मधुकर जोशी यांनी बँकेला पेन्शनधरकाचे निधन झाल्याची माहिती न देता पेन्शनची उचल करणे निरंतर सुरू ठेवले होते. मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रकोपामुळे पेन्शन दर महिन्याला येत नव्हती.

ऑगस्ट महिन्यात एकरकमी १ लाख ७० हजार रुपये खात्यात जमा झाले. सप्टेंबरमध्ये २३ हजार रूपये जमा झाले. दरम्यान सून सपना जोशी यांनी कन्हानच्या एसबीआय बँकेत जाऊन पेन्शन एटीएम कार्डची तंत्रिकीय बिघाड सांगितले असता बँक अधिकारी यांनी अर्ज करायला सांगताच सुनेने मृतक सासूच्या नावाने अर्ज करून सही केली असता भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला व पेन्शन धारक मरण पावल्याची माहिती झाली त्वरित हे पेन्शन खाते बंद करण्यात आले व उर्वरित रक्कम त्वरित कोषागार विभागाला पाठविण्याचे आदेश बँक मॅनेजर गिरीश लाडे यांनी सहाय्यक बँक मॅनेजर विजय राहाटे याना दिले.शेतात क्रेनने काम करीत होते आई आणि मुलगा; ३० फूट खोल विहिरीत बसला होता काळ

मृत पेन्शनधारकच्या नावावर पेन्शनची उचल; गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
शेतात क्रेनने काम करीत होते आई-मुलगा; ३० फूट खोल विहिरीत बसला होता काळ

मात्र, यासंदर्भात पेन्शनधारक महिलेच्या मुलगा व सुनेने बँकेची दिशाभूल करून पेन्शनची उचल केली. तेव्हा या दोषींवर विश्वासघात करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी स्थानिक जुनी कामठी पोलिस ठाण्यात अर्जदार नरेश चौकसे यांनी धाव घेतली. मात्र पोलिस विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नरेश चौकसे यांनी केला आहे.

(Pick up the pension in the name of the deceased pension holder men)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.