कोंढाळी (जि. नागपूर) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील २० हजार लोकसंख्या असलेले कोंढाळी हे गाव काटोल तालुक्यातील सर्वात मोठे गाव. १७ ग्रामपंचायत सदस्य असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या गावाची ओळख आहे. मात्र, गावात डुक्करांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, गावात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या उदासीन धोरणाचा फटका नागरिकांना बसत आहे.
कोंढाळी ग्रामपंचायतमध्ये सहा वॉर्ड असून, सहाही वॉर्डात डुक्करांनी हैदोस घातला आहे. याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायतला तक्रारी नोंदविल्या. अखेर ग्रामपंचायतने मोठा वाजागाजा करीत ९ जूनला नागपूरवरून ‘टीम’ला पाचारण करून फक्त एक दिवस देखावा म्हणून डुक्करे पकडण्याची मोहीम राबवित वाहावाही करून घेतली. मात्र, दुसऱ्या दिवसापासून ही मोहीम पूर्णत: बंद करण्यात आली.
कोंढाळी येथील विकासनगर व सायखोड येथे मोठ्या प्रमाणात डुक्करांना पाळले जाते. त्यांच्या मासाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी येतात. याबाबत डुक्करांच्या मालकांना समज देऊनही हैदोस सुरूच आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांनी ९ जून रोजी नागपूरवरून चमूला पाचारण करून डुक्करांच्या कळपाला पकडून जंगलात सोडण्यासाठी त्यांना पकडण्याची मोहीम राबवित असताना विकास नगर येथील व्यक्तीने ग्राम विकास अधिकारी दिलीपसिंह राठोडसह ग्रा. प.कर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली.
गावात हैदोस घालणाऱ्या डुक्करांना पकडले असता त्या डुक्करांना सोडविण्यासाठी भांडण झाले. कोंढाळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. खरे तर येथील डुक्करांचे कळप पोसणाऱ्या मालकांचे वन्य प्राण्यांची अवैध शिकार करणे, अवैध दारू भट्ट्या लावून खुलेआम अवैध दारूविक्री व डुक्करांचे मास विक्री हा त्यांचा व्यवसाय आहे. तसेच यांच्या विरोधात कुणी बोलले तर मारण्यास धावतात व पाहून घेण्याची धमकी देतात. यामुळे नागरिक या भानगडीत न पडता जे होत आहे ते उघड्या डोळ्याने पाहण्याचे काम करतात.
पारशिवनीः जागोजागी पाण्याचे डबके, त्यात मच्छरांचे वास्तव वरून भर डुकरांची. आधीच डासांच्या प्रकोपाने नागरिकांना अनेक आजारांनी ग्रासले असताना शहरात जागोजागी डुकरांचे कळप शहरात बिनधास्त वावरत आहेत. शहरातील अनेक प्रभागात सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने जागोजागी सांडपाण्याचे डबके साचलेले आहेत. त्यात या डुकरांचे नेहमीचे वास्तव असून अनेक भागात दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांच्या निवासस्थानी ही डुकरे प्रवेश करत आहेत. सर्वत्र अस्वच्छता पसरत असल्याने नागरिकांना आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.