Pitru Paksha : चिंता नको, पितृपक्षात बिनधास्त खरेदी करा!

‘सोने घ्या, लग्न ठरवा, पूर्वजांचे आपल्याला आशीर्वादच मिळतात’
pitru paksha
pitru paksha sakal
Updated on

नागपूर - पितृपक्ष पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ. या काळात शुभकार्य करणे अशुभ मानने गैरसमज आहे. खिशात पैसे असेल तर या काळात बिनधास्त खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे, असा सल्ला ज्योतिष्यशास्त्रींचा आहे.

पितृपक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू झाले असून १४ ऑक्टोबरपर्यंत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, श्राद्धाच्या १६ दिवसांमध्ये आपल्या पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येतात. या दिवसांमध्ये पिंडदान आणि तिलांजली अर्पण करून पितरांना संतुष्ट केले जाते. काही ज्योतिष्यांनी खरेदी करण्याबाबत वेगळे मतही व्यक्त केलेले आहे.

पितृपक्षात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी मान्यता आहे. पितृपक्षाचे १६ दिवस अयोग्य मानले जातात. या काळात सोने, घर तसेच मौल्यवान वस्तूंची

चिंता नको, पितृपक्षात बिनधास्त खरेदी करा!

खरेदी-विक्री केली जात नाही. विवाहाचे मुहूर्तही टाळले जातात. परंतु, या समजुती चुकीच्या आहेत. याच काळात पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असल्याने खरेदी-विक्री करण्यास हरकत नाही. आपले व्यवहार पूर्ववत ठेवून जुन्या चालीरीतींना फाटा द्यावा. १६ दिवस खरेदी-विक्री बंद करता मग जेवण का बंद करीत नाही, असा प्रश्‍नही ज्योतिष्यांनी उपस्थित केला.

pitru paksha
Pune News : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत हडपसरमध्ये तेवीस टन कचरा झाला गोळा

पितृपक्षात खरेदी-विक्री करू नये, ही जुनी परंपरा आहे. अत्याधुनिक काळातही त्याचीच री ओढली जाते. परंतु, पितृपक्षातच अधिकतम घाऊक व्यापारी खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. नवरात्र आणि दिवाळीची खरेदी करण्यासाठी हा ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला काळ असतो. या काळात ग्राहक कमी असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. परंतु, ग्राहक या दिवसांत नवीन वस्तू, वाहन, कपडे, लग्नाची खरेदी करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

हेमंत गाधी, माजी अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

आपले पूर्वज या दिवसात पृथ्वीवर येतात, अशी मान्यता असेल तर या दिवसांत करीत असलेल्या गोष्टींना पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल.पूर्वजांचा आशीर्वाद वाईट कसा असेल? ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, संपत्ती दिली अशा पूर्वजांना आपण पितृपक्षातील या दिवसात श्रद्धांजली वाहत असतो. हा पंधरवडा त्यांच्या स्मरणाचा काळ. यामुळे या काळात खरेदी करणे वाईट अथवा अशुभ कसे असू शकते. हा अंधविश्‍वास आहे. पंचांगात काही सुविधा दिलेल्या आहेत. अडचणीच्या वेळी सुविधा नसल्या तरी लग्न, खरेदी अथवा इतरही मुहूर्त काढले जातात.

डॉ. अनिल वैद्य, ज्योतिष्य विश्वगुरू

pitru paksha
Vitamin D : शरीरात किती प्रमाणात असते व्हिटॅमिन डी ची गरज, सप्लिमेंट्स कधी घ्यावेत? इथे वाचा सविस्तर

पितृपक्षात किरकोळ वस्तू खरेदी-विक्री व्यवहार करण्यास हरकत नाही. या काळात लोकांनी आपले व्यवहार पूर्ववत ठेवावे. या दिवसात दीर्घकाळ टिकेल अशा वस्तू खरेदी-विक्री करणे अयोग्य आहे. पितृपक्षात सोने, गृह, मौल्यवान वस्तूंची खरेदी करू नये, असे शास्त्रात म्हटले आहे.

भूपेश घाडगे, ज्योतिषी

pitru paksha
Todays Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 2 ऑक्टोबर 2023

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.