पितृपक्षही सेलिब्रेट करा; पंधरवड्यात वस्तू खरेदी करणे शुभच

पितृपक्षही सेलिब्रेट करा; पंधरवड्यात वस्तू खरेदी करणे शुभच
Updated on

नागपूर : पितृपक्षात खरेदी करणे अथवा नवीन काही करणे बरेचजण अशुभ मानतात. हे दिवस अशुभ नसतात असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, या काळात फक्त पितरांचे स्मरण करायचे असल्याने दुःखाने नव्हे तर आनंदाने सिलीब्रेट करा, दाग-दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लग्नाच्या बोलणीही करण्यासाठी कहीही हरकत नाही. उलट या काळात आपले पितर आपल्याकडे येत असल्याने त्यांनाही आपण काही घेतले तर आनंदच होणार आहे. पितृपक्षात काही खरेदी करू नये, अथवा नवे काम करू नये हा अंधविश्वास आहे, असे ज्योतिष्याचे अभ्यासक अनिल वैद्य यांनी सांगितले.

आधुनिक काळात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना लोक चंद्र आणि मंगळावर जाऊ लागले आहे. आपण ही बुरसटलेल्या अंधविश्वासात जगतो आहे. अंधविश्वासाला बाजूला सारून नवीन वस्तू, नवीन कार्य, खरेदी, विक्री करा. शास्त्रात कुठेही या काळात नवीन कामे करू नका असे म्हटलेले नाही. उलट याकाळात नवीन काम केल्यास पितरांना आनंदच होईल. खरेदी करणे अशुभ नसतेच.

पितृपक्षही सेलिब्रेट करा; पंधरवड्यात वस्तू खरेदी करणे शुभच
फडणवीस सरकारच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊल

भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील, त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध करतात. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक विधींची परंपरा आहे. हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष वा श्राद्धपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या तर्पणाचा पक्ष. तर्पण करावयाचे म्हणजे श्रद्धेने, मनोभावाने त्यांचे स्मरण करायचे.

आश्विन महिन्यातील अमावस्येपर्यंत हा पितृपक्ष असतो. या काळात पितर आपल्या कुटुंबाच्या सानिध्यात येतात अशी मान्यता आहे. त्यामुळे या काळात अन्नदान केले जाते. श्राद्ध तीन पूर्वजांचे करावे असे शास्त्र सांगते. वडील, आजोबा व पणजोबा. वडिलांना वसूसमान, तर आजोबांना रुद्र देवतेसमान मानले जाते. पणजोबांना आदित्य देवतेसमान मानले जाते. श्राद्धाच्यावेळी याच देवता आपल्या पितरांचे प्रतिनिधित्व करतात.

वास्तविक नवीन वस्तू विकत घेणे किंवा कोणत्याही शुभकार्यासाठी हा काळ अशुभ नाही. पण, या पंधरा दिवसांत रोज पितरांचे श्राद्ध करावे असे शास्त्र सांगते. अनेकजण लग्न वगैरे ठरविणेही या काळात टाळतात. तसेही करण्याची गरज नाही.
- देवब्रत बूट, गृहदृष्टीचे संचालक
पितृपक्षही सेलिब्रेट करा; पंधरवड्यात वस्तू खरेदी करणे शुभच
३ कोटी ३३ लाखांनी फसवणूक; कर बुडविणाऱ्याविरुद्ध गुन्हा
पितृपक्षात खरेदी करू नये हा पूर्णपणे अंधविश्वासाचा भाग आहे. उलट या काळात खरेदी केल्यास स्वर्गवासी या काळात पृथ्वीवर येत असतात असे म्हटले जाते. ते जर पृर्थ्वीवर येत असेल असे आपण म्हणत असलो तर या काळात खरेदी केल्यास त्यांनाही आनंदच होईल. या काळात खरेदी करणे योग्यच आहे.
- हेमंत गांधी, माजी अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()