Plane : उपराजधानीत विमान प्रवाशांचा आलेख उंचावला; सव्वादोन लाखांनी वाढली संख्या़

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २०२३-२४ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २ लाख २८ हजार प्रवाशांची वाढ झाली.
Nagpur Airport
Nagpur Airportsakal
Updated on

नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर २०२३-२४ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २ लाख २८ हजार प्रवाशांची वाढ झाली. संपलेल्या आर्थिक वर्षात २२ हजार उड्डाणांच्या माध्यमातून २७.९४ लाख लोकांनी हवाई प्रवास केला. त्यात १ लाख ११ हजार विदेशी आणि २६ लाख ८३ हजार देशांतर्गत प्रवासी होते. नागपूरसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. २०२२-२३ मध्ये प्रवासी संख्या २५ लाख ६५ हजार होती.

राज्याच्या उपराजधानीसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन हेवीवेट नेत्यांचे हे शहर आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना भेटण्यासाठी अनेक जण शहरात येतात. याशिवाय व्याघ्र राजधानी म्हणून अनेक पर्यटक नागपूरमार्गे ताडोबा अंधारी, पेंच, कान्हा, बांधवगड आदी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या दर्शनासाठी जातात. याशिवाय अनेक नवीन उद्योग नागपुरात येऊ घातले असून, काही आलेले आहेत.

त्यामुळे व्यवसाय वृद्धीसाठीही देश-विदेशातील नागरिकांची वर्दळ विमानतळावर वाढली. तसेच मुंबई, पुणे, बंगळूरूसह अनेक शहरात विदर्भातील युवावर्ग नोकरीच्या निमित्ताने तिकडेच स्थायिक झाले आहेत. तेही आपल्या आई-वडिलांसह इतरांना भेटण्यासाठी कायम शहरात येतात. विमान प्रवास सुलभ आणि सोपा झाल्याने सामान्यांचा हवाई प्रवासाकडे ओढा वाढला आहे.

शहरातून देशाच्या अन्य शहरांमध्ये थेट सेवा सुरू झाल्यास प्रवासी संख्येत वाढ होऊ शकते. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकता, इंदूर, अहमदाबाद, लखनऊ, गोवा, चेन्नई, नाशिक, बेळगाव, अजमेर या घरगुती उड्डाणांसोबतच शारजाह आणि दोहा ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. सर्वाधिक उड्डाणे दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरूकडे आहेत.

विमानांचे उड्डाण

अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरातून हवाई प्रवासी संख्येत वाढ होत असून, उन्हाळ्यात वाढीची नोंद आहे. सध्या ६२ हून अधिक विमानांचे उड्डाण होते. सध्या नागपुरातून दररोज ७,५०० ते ८ हजार लोक प्रवास करतात.

वर्ष = उड्डाणांची संख्या

२०२२-२३ = २० हजार ४४०

२०२३-२४ = २२ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com