14 मजल्याचे घर बांधून संपत्तीचे प्रदर्शन लाजीरवाणे; महेश एलकुंचवार यांची मुकेश अंबानींवर टीका

Mahesh Elkunchwar MUKESH AMBANI
Mahesh Elkunchwar MUKESH AMBANIESAKAL
Updated on

नागपूर- ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावर टीका केलीये. तसेच त्यांनी साहित्य संमेलनावर आमले परखड मत व्यक्त केलंय.ते म्हणाले की,'बिर्ला, अडाणीसारखे लोक मोठे-मोठाली मंदिरं बांधतात. मुकेश अंबानींचे घर तर लाजीरवाणी गोष्ट आहे. १४ मजली घर त्यांनी बांधलंय. संपत्तीचे असं प्रदर्शन चांगली गोष्ट नाहीये. पण, या मानसांकडून आपण अपेक्षा करायची नाही. बदलामध्ये कायम मध्यमवर्ग पुढे राहिला आहे. पण, गेल्या तीस-चाळीस वर्षात मध्यमवर्ग आपली ही पंरपरा विसरलाय असं मला स्पष्टपणे वाटतं.' (playwright and screenplay writer in Marathi Mahesh Elkunchwar reliance industries mukesh ambani home)

Mahesh Elkunchwar MUKESH AMBANI
Devendra Fadanvis: अजित पवार- शरद पवारांच्या गुप्त बैठकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,'या भेटीबाबत मला...'

एलकुंचवार यांनी साहित्य संमेलनावरही आपलं मत व्यक्त केलं. मला वाटतं की वर्षातून एकदाच साहित्य संमेलनावर दोन-तीन कोटी रुपयांचा खर्च करणे चुकीचे आहे. त्याऐवजी दर महिन्याला एका जिल्ह्याच्या ठिकाणी काही साहित्यिकांना बोलावून तीन दिवसाचा कार्यक्रम केला तर बरं राहिल. याला पैसे कमी लागतील. लेखकांसोबत स्थानिक लोकांचे आदानप्रदान जास्त होईल आणि त्याचं स्वरुप गंभीर राहील, असं परखड मत महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केलंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.