नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला. यांसह जिंकण्याची सवय लागलेल्या पंतप्रधान मोदींनी निवडणुका कशा जिंकल्या जातात याचा मंत्र रविवारी सांगितला. नागपूर इथं विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. (PM Modi who has made history in Gujarat gives mantra of winning elections)
मोदी म्हणाले, "गुजरातमध्ये निवडणुकीचा जो निकाल आला आहे, तो स्थायी विकास आणि त्यासंबंधीच्या आर्थिक नितीचा परिणाम आहे. मी शॉर्टकट घेणाऱ्या राजकारण्यांना देखील विनम्रता पूर्वक आदरपूर्वक सांगेन की, स्थायी विकासाच्या व्हिजनला समजून घ्या. त्याचं महत्व समजून घ्या. आज देशाला त्याची गरज आहे ते समजून घ्या. शॉर्टकटशिवाय स्थायी विकास करुनही तुम्ही निवडणुका जिंकू शकता. वारंवार निवडणूक जिंकू शकता. अशा स्थायी विकासावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या राजकीय पक्षांना मी सांगू इच्छितो की त्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण मला विश्वास आहे की तुम्ही देशहित सर्वोतोपरी ठेवाल तर शॉर्टकच्या राजकारणाचा रस्ताही सोडून द्याल"
दरम्यान, पंतप्रधानांनी हिंदुदृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनं केलं. हा टप्पा नागपूर ते शिर्डीपर्यंत जाणारा आहे. पुढे तो मुंबईपर्यंत नेला जाणार आहे. या संपूर्ण महामार्गाची लांबी ७२० किमी इतकी आहे. राज्यातील सुमारे १० जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे. यासाठी ५५,००० कोटी रुपये इतका खर्च आला आहे.
याशिवाय नागपूरमध्ये आणखी दहा प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपुजनाचा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्रातील या सर्व प्रकल्पांचा एकूण खर्च ७५,००० कोटी रुपये इतका आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.