Nagpur : मेडिकलमध्ये बनावट औषधांचा पुरवठा,हजारो रुग्णांना वाटप : चार संचालकांविरोधात गुन्हा दाखल

Nagpur Medical : नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा केल्याबद्दल चार संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे हजारो रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 medical
medicalsakal
Updated on

नागपूर : मेडिकल रुग्णालयात हजारो रुग्णांना बनावट औषध वाटप प्रकरणी चार पुरवठादार कंपन्यांच्या संचालकांसह इतर आरोपींविरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक नितीन पद्माकर भांडारकर यांनी तक्रार दिली.

सुरत येथील मे. फार्मासिक्स बायोटेक टेनामेंटच्या प्रीती सुमित त्रिवेदी, कोल्हापुरतील मे. विशाल एन्टरप्रायजेसचे सुरेश दत्तात्रय पाटील, भिवंडीतील मे. अक्वेटिस बायोटक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मिहिर त्रिवेदी, मिरा रोडवरील मे.काबीज जनेरीकचे संचालक विजय शैलेंद्र चौधरी आणि इतर असे गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील मे.विशाल एन्टरप्रायजेसने २० जुलै २०२३ मध्ये मेडिकलला ७७ हजार ३७० औषधांचा पुरवठा केला होता. दरम्यान त्यानंतर एका महिन्यात नितीन पद्माकर भांडारकर यांनी औषधाचे नमुने घेतले. ते मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले होते.

त्याच्या अहवालात औषधांबाबत ‘क्युरिअस’ असे नमूद करण्यात आले. त्यांनी केलेल्या चौकशीत मे. विशालने औषधे सुरतच्या डिंडोली येथील मे. फार्मासिक्स बायोटक येथून खरेदी केल्याची बाब समोर आली. याशिवाय ‘विशाल’ने ती भिवंडीतील नारपोली येथील मे अक्टिव्हेंटीस बायोटक प्रायव्हेट लि.मधून घेतल्याचे आढळले.

अक्टिव्हेंटीसने ही औषधे मिरा रोड येथील मे.काबीज जनेरिक हाऊसमधून खरेदी केल्याचे प्रशासनाने केलेल्या चौकशीत आढळले. याशिवाय अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मे.काबीज कंपनीला विचारणा केली असता त्यांनीही औषधे कुठून आणली याची माहिती दिली. ही संपूर्ण माहिती घेत, नितीन भांडारकर यांनी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.

या औषधांचा झाला पुरवठा

मेडिकल रुग्णालयात आलेल्या हजारो रुग्णांना ‘रिक्लॅव्ह ५२५’ नावाच्या ७७ हजार बनावट औषधांचे वाटप करण्यात आले. हे औषध ॲन्टीबायोटिक असून सर्दी, खोकल्यासाठी वापरण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.