वर्दीवर लागणार ‘तिसरा स्टार’; १६०० उपनिरीक्षकांना ‘दिवाळी गिफ्ट’

वर्दीवर लागणार ‘तिसरा स्टार’; १६०० उपनिरीक्षकांना ‘दिवाळी गिफ्ट’
Updated on

नागपूर : पोलिस महासंचालक कार्यालयाने नुकतेच राज्यभरातील १,६०० पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यास मंजुरी दिली आहे. तशी निवडसूचीसुद्धा जाहीर केली आहे. आता दिवाळीपूर्वीच पीएसआय यांना सहायक पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळणार असून, वर्दीवर तिसरा स्टार लागणार आहे. त्यामुळे राज्यातील पोलिस अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

अनेक दिवसांपासून राज्यातील पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. बहुप्रतिक्षेत असलेल्या पदोन्नत्यांना गेल्या आठवड्यात मुहूर्त मिळाला. आठवड्याभरापूर्वीच राज्यातील १,६२० पोलिस उपनिरीक्षकांची पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, माहिती मागविण्यात आली आहे. आता लवकरच एपीआय पदोन्नतीची अंतिम यादी लागणार आहे.

वर्दीवर लागणार ‘तिसरा स्टार’; १६०० उपनिरीक्षकांना ‘दिवाळी गिफ्ट’
अवघी १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक

पोलिस उपनिरीक्षक पदावर ज्यांचा प्रशासकीय कालावधी पूर्ण झाला आहे, असे अनेक पीएसआय आहेत. अशा अधिकाऱ्यांची एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी बदली होणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत प्रमोशन मिळणार आहे. बदली झालेल्या शहरात प्रमोशन मिळालेल्या अधिकाऱ्यांना पोस्टिंग देता येत नसल्याने अशा अधिकाऱ्यांची पुन्हा बदली करण्यात येणार आहे. अशा स्थितीमुळे अनेक पोलिस अधिकारी संभ्रमात पडले आहेत.

दोनदा करावी लागेल धावपळ

बदली झाल्यामुळे उपनिरीक्षकांनी एका शहरातून दुसऱ्या शहरात कुटुंबासह शिफ्ट व्हावे लागेल. त्यांना सर्व बिऱ्हाड घेऊन नव्या शहरात बस्तान मांडावे लागेल. मुलांचे शिक्षण-शाळा आणि नव्या शहरात संसाराची घडी बसवावी लागेल. पुन्हा दोन ते अडीच महिन्यात त्यांची पदोन्नतीने बदली होणार आहे. बदलीमुळे एकदा आणि पदोन्नतीमुळे दुसऱ्यांदा अशी कसरत पोलिस अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.

वर्दीवर लागणार ‘तिसरा स्टार’; १६०० उपनिरीक्षकांना ‘दिवाळी गिफ्ट’
निर्बंधात शिथिलता सोमवारपासून? चेहऱ्यावर फुलणार हास्य

नागपुरातील ७७ अधिकारी

नागपूर शहर पोलिस दलातील ७७ पोलिस उपनिरीक्षक पदोन्‍नतीच्या कार्यकक्षेत आहेत. तसेच जवळपास सर्वच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पण प्रस्तावित आहेत. पोलिस महासंचालक हे शिस्तप्रिय आणि वेगवर्धित कामकाजासाठी प्रसिद्ध आहेत. महासंचालकांनी डीपीसी मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची संख्या निश्चित करावी, त्यांच्याकडून संवर्ग मागवून लवकरात लवकर पदोन्नती दिल्यास पोलिस अधिकाऱ्यांना दोनदा शिफ्टिंग करण्याची वेळ येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.