भिवापूर : जनावरे निर्दयतेणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असलेली दोन वाहने ताब्यात घेत पोलिसांनी १६ जनावरांना जीवदान दिले. ही कारवाई धामणगाव टाका मार्गावर रात्रीच्या सुमारास करण्यात आली. यात एकूण २६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला..रविवारी रात्रीच्या सुमारास ठाणेदार जयप्रकाश निर्मल हे सहकाऱ्यांसह परिसरात पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान रात्री दहा वाजताच्या सुमारास धामणगाव टाका मार्गावर दोन वाहने (क्रमांक एमएच १८, बीजी ५१९७) आणि (एमएच४८/एवाय८४३४) संशयास्पद स्थितीत जातांना दिसून आली. त्यांना थांबवून चौकशी केली असता दोन्ही वाहनांत प्रत्येकी ८ असे १६ बैल निर्दयतेने कोंबलेले आढळून आले. पोलिसांनी वाहने ताब्यात घेऊन बैलांना मुक्त केले..याप्रकरणी आरोपी अब्दुल रहमान मोहम्मद जमाल शेख (शिवनगर, नागभीड, जि.चंद्रपूर), धनराज अंबादास गुरपुडे(विलम, ता. नागभीड,जि.चंद्रपूर), रियाज कुरेशी (रा. नागभीड,जि.चंद्रपूर), सौरभ सोनडवले (रा. विलम, ता. नागभीड, जि.चंद्रपूर) व राजू कुरेशी(नागभीड) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. १६ बैल (किंमत २ लाख ४० हजार) व दोन वाहने (किंमत२४लाख), असा एकूण २६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला..पकडलेली जनावरे कत्तलीसाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे नेली जात होती, अशी माहिती ठाणेदार निर्मल यांनी दिली. उपनिरीक्षक संदीप सडमेक पुढील तपास करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.