‘सेक्स रॅकेट’ चालत असलेले दोन घरे सील, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

red light area nagpur
red light area nagpure sakal
Updated on

नागपूर : गंगाजमुनातील (ganga jamuna red light area nagpur) देहव्यापार समर्थक महिला आणि विरोधकांमध्ये रविवारी झालेल्या संघर्षानंतर आज पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी ‘सेक्स रॅकेट’ चालत असलेली दोन घरे सील केली. रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या नेत्या ज्वाला धोटे आणि आभा पांडे यांच्या समर्थकांवर लकडगंज पोलिसांनी (lakadganj police nagpur) गुन्हे दाखल केले आहेत.

red light area nagpur
रसायनशास्त्र विभाग प्रमुखांची आत्महत्या, पतीच्या मृत्यूनंतर होता मानसिक तणाव

प्राप्त माहितीनुसार, गंजाजमुना हटविण्यासाठी नगरसेविका आभा पांडे तर वारांगनांच्या समर्थनार्थ ज्वाला धोटे यांच्या समर्थकांना रविवारी गंगाजमुनात चांगला राडा घातला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. गंगाजमुनात आजही तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे पोलिसांनी अजूनही जमावबंदीचा आदेश कायम ठेवला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी देहव्यापार करणाऱ्या दोन महिलांच्या घराला सील करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच अन्य सात इमारतींना सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या वारांगनांचे गंगाजमुनात घर आहे, त्या सर्व महिला तेथे राहू शकतात. मात्र, तेथे देहव्यापाराचे अड्डे सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. या वस्तीत १८८ वेश्‍यालय असून पोलिसांनी बाहेरून येणाऱ्या ग्राहकांना रोखण्यासाठी गंगाजमुना वस्तीला बॅरिकेट्स लावले आहेत.

तरूणींनी गाठले घर -

गंगाजमुनात मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उडीसा, पश्‍चिम बंगाल, राजस्थान या राज्यातील तरुणी वेश्‍याव्यवसाय करायला येतात. पोलिसांनी केलेली कारवाई आणि वस्तीत झालेला राडा, ही स्थिती पाहता अनेक तरुणींनी आपल्या घराचा रस्ता धरला आहे. येथे राहणाऱ्या वारांगना देहव्यापार करीत असल्यामुळे पोलिसांना विरोध करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.