मैत्रीपूर्ण संबंधात पती ठरायचा अडसर; मित्राच्या मदतीने केला ‘गेम’

मैत्रीपूर्ण संबंधात पती ठरायचा अडसर; मित्राच्या मदतीने केला ‘गेम’

Published on

नागपूर : पतीचा मदतनीस म्हणून कामावर असलेल्या युवकाशी महिलेचे मैत्रीपूर्ण संबंध जुळले. तिने पतीच्या त्रासाला कंटाळून पतीची मित्राला सुपारी दिली. मित्राने साथीदाराच्या मदतीने पतीचा चाकूने भोसकून खून केला. हे हत्याकांड मंगळवारी खापा परिसरात उघडकीस आले. प्रदीप बागडे (४७, रा. वंजारीनगर, पाण्याची टाकी, अजनी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या हत्याकांडात प्रदीपची पत्नी सीमा बागडे (३८) आणि तिचा मित्र पवन विठ्ठलराव चौधरी (वय २१, रा. रामेश्वरी मूळ रा. थडीपवनी) यांना अटक केली आहे. तसेच एका १७ वर्षीय मुलालासुद्धा कटात सहभागी असल्यामुळे ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप बागडे हे प्रॉपर्टी डिलर आहेत. तसेच त्याचे बिर्याणी सेंटरही आहे. पवन चौधरी हा अविवाहित असून प्रदीप बागडेकडे कारवॉशिंगचे काम करतो. तो बागडे यांच्या मदतीने रिकाम्या प्लॉटवर चायनिजचा ठेला चालवितो. तसेच बागडेच्या गाडीवर चालक म्हणूनही कामाला आहे. सीमा व प्रदीप बागडे या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. सीमाने पवन याला तो राहत असलेला भूखंड आणि तीन लाख रुपयांमध्ये बागडे यांच्या हत्येची सुपारी देत ५० हजार रुपये दिले.

मैत्रीपूर्ण संबंधात पती ठरायचा अडसर; मित्राच्या मदतीने केला ‘गेम’
‘तुझ्या पतीचा अपघात झाला, माझ्यासोबत लवकर चल’ अन्...

पवन याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने बागडेच्या हत्येचा कट आखला. १६ सप्टेंबरला कामानिमित्त जायचे असल्याचे सांगून पवन व साथीदार बागडे याला कारने घेऊन वरुड येथे गेले. तेथे अल्पवयीन साथीदाराने लोखंडी रॉडने बागडे याच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर पवन याने चाकूने सपासप बागडेच्या शरीरावर वार केले. बागडे यांचा मृतदेह पोत्यात टाकला. त्यानंतर बागडे यांचा मृतदेह खापा परिसरात फेकला. मंगळवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. याप्रकरणी खापा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हुडकेश्‍वर पोलिसांनी केली अटक

हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या पथकाला ढगेच्या बंगल्याजवळ पवन व साथीदार संशयास्पद स्थितीत दिसले. पोलिसांना बघताच दोघे पळायला लागले. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले. चौकशी केली असता बागडे यांची हत्या केल्याचे दोघांनी सांगितले. पोलिसांनी दोघांना खापा पोलिसांच्या स्वाधीन केले.

मैत्रीपूर्ण संबंधात पती ठरायचा अडसर; मित्राच्या मदतीने केला ‘गेम’
किती हे प्रेम! चक्क कोंबड्याचा वाढदिवस केला साजरा

...म्हणून केला ‘गेम’

विवाहित असलेल्या सीमाची प्रदीपशी ओळख झाली. दोघांची मैत्री आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. सीमाने पहिल्या पतीला घटस्फोट देऊन प्रदीप यांच्याशी लग्ने केले. पहिल्या पतीकडून तिला मुलगी आहे तर दुसऱ्या पतीकडूनही तिला मुलगी आहे. सीमा बिनधास्त स्वभावाची होती. तिची पवनसह अन्य चार ते पाच जणांशी मैत्री होती. त्यांचे घरी येणे-जाणे होते. त्यामुळे मैत्रीमध्ये पती अडसर ठरत होता. त्यामुळे तिने पवनला पतीच्या खुनाची सुपारी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()