Nagpur News : मृत्यूला कवटाळताना प्रफुल्लने वाचवला तिघांचा जीव

३५ वर्षीय प्रफुल्ल मधुकर देऊळकर अपघातात गंभीर जखमी झाले. मेंदूपेशी मृत पावल्या. ऐन तारुण्यात नियतीने कुटुंबातील कर्ता पुरुष हिरावला.
Prafull Deulkar
Prafull DeulkarSakal
Updated on

नागपूर - ३५ वर्षीय प्रफुल्ल मधुकर देऊळकर अपघातात गंभीर जखमी झाले. मेंदूपेशी मृत पावल्या. ऐन तारुण्यात नियतीने कुटुंबातील कर्ता पुरुष हिरावला. परंतु आभाळाएवढे दुःख पचवून कुटुंबीयांनी प्रफुल्लचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे मृत्यूला कवटळताना प्रफुल्लने तिघांचा जीव वाचविला.

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील प्रफुल्ल मधुकरराव देऊळकर घरासमोर काम करीत समोरच्या १० फूट खोल खड्ड्यात कोसळले. तत्काळ १४ सप्टेंबरला सेवाग्राम येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू झाले; परंतु काही वेळानंतर उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसले.

अपघातामुळे प्रफुल्ल यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला. त्यांच्या मेंदूपेशी मृत पावत असल्याचे निदान ब्रेन डेड समितीतील डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, डॉ. तुषार पाटील, डॉ. संदीप अइतवार, डॉ. अमोल आंधळे यांनी केले. मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांना अवयदानासंदर्भात विचारणा केली.

डॉ. विठ्ठल शिंदे यांनी कुटुंबीयांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. प्रफुल्ल यांच्या पत्नी स्नेहा आणि भाऊ संजय देऊळकर यांनी लेखी परवानगी दिली. कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना माहिती देण्यात आली.

तत्काळ समन्वयक दिनेश मंडपे यांनी प्रतीक्षा यादी तपासली. त्यानुसार प्रफुल्लचे अवयवदान करण्यात आले. दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतरही कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. प्रफुल्ल यांना समितीतर्फे अभिवादन करण्यात आले.

यकृतदानातून ५३ वर्षीय पुरुषाचा वाचवला जीव

समितीने अवयवदानाची यादी तपासली असता वोक्हार्ट रुग्णालयात ५३ वर्षीय पुरुष यकृताच्या प्रतीक्षेत होता. तत्काळ ग्रीन कॉरिडारच्या माध्यमातून प्रफुल्लचे यकृत वोक्हार्टमध्ये आणले. तत्काळ या व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित केले.

किडनीदानातून केअर रुग्णालयात एक ४३ तर आचार्य विनोबा भावे रुग्णालयात २९ वर्षीय पुरुषाला दान करण्यात आले. अवयवदानाची चळवळ शहरापुरती मर्यादित होती, मात्र अलीकडे ग्रामीण भागातही अवयवदानाचा धर्म निभावला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()