प्रणिती शिंदे म्हणाल्या, तुमच्यासाठी अधिवेशन चुकवले ; बरोबर केल, की चूक...

Praniti Shinde says, The need for a smart village is more than a smart city
Praniti Shinde says, The need for a smart village is more than a smart city
Updated on

नागपूर : मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. परंतु, अधिवेशनाचा पहिला दिवस बुडवून मी येथे तुम्हाला भेटायला आली. "बरोबर केलं, की चूक' माहिती नाही. मात्र, तुमच्याशी बोलून तुमच्याकडूनही काही शिकायला मिळेल म्हणून आले, असे म्हणत सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी टाळ्या घेत सभागृहातील विद्यार्थ्यांची मने जिंकली. 

गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजीच्या वतीने वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित विदर्भ विद्यार्थी संसदेच्या उद्‌घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या. छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही आपण परावलंबी होत चाललो आहोत. काहीही शोधण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपल्याला स्मार्ट फोनची गरज भासते. त्यामुळे "स्मार्ट सिटी पेक्षा स्मार्ट व्हिलेजेस' झाले पाहीजे, असे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. 

आज शहरांतील लोक पुढारलेले आहेत, असे आपण मानतो. पण खऱ्या अर्थाने आपण माघारत चाललो आहोत. कारण, निसर्गापासून आपण दुरावत चाललो आहो. याउलट खेड्यांतील लोक आजही आकाशाकडे बघून अचूक वेळ सांगतात. पाणी आणि माती पाहून पिकांचा अंदाज घेतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या फक्त निसर्गाकडूनच मिळतात. हे विसरत चालल्याने आपण माघारत आहोत, असेही शिंदे महणाल्या. 

पुढाकारानेच गॅप कमी होईल

राजकीय मंडळी आणि सामान्य जनतेमधील "कम्युनिकेशन गॅप' वाढत चालला आहे. पण असे नसावे. लोकप्रतिनीधी तुमच्या मतांवरच निवडून गेलेले असतात. त्यामुळे त्यांनी तुमच्यासाठी उपलब्ध असले पाहीजे आणि तुम्ही युवांनीही त्यासाठी आग्रही असले पाहीजे. तुमच्या पुढाकारानेच हा गॅप कमी होऊन लोकशाही बळकट होणार आहे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. 

महिलांचे रक्षण करण्यातच पुरुषार्थ

नुकत्याच हिंगणघाट, सोलापूरमध्ये महिलांवर अत्याचाराच्या भयंकर घटना घडल्या. सोलापूरच्या प्रकरणात पीडितेने सहा महीने पोलिसांत जाण्याची हिंमत केली नाही. अन्यायाला वाचा फोडली पाहीजे. महिला पुरुषाच्या आधी जेवण किंवा पूजा करण्याचा मान कधीच मागत नसून संकटात सुरक्षा मागते. तो तिचा अधिकार तिला मिळवून देण्यातच खरा पुरुषार्थ आहे. खरा पुरुष तो आहे जो महिलांचे रक्षण करतो, तो नव्हे जो अत्याचार करतो असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.