छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू करतोय पेट्रोलपंपावर काम

छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू करतोय पेट्रोलपंपावर काम
Updated on

नागपूर : राष्ट्रीय आट्यापाट्या खेळाडू प्रवीण वहालेने दीड दशकाच्या कारकिर्दीत १५ च्या वर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. आठ सुवर्णांसह अनेक पदके व पुरस्कार जिंकलेत. राज्याचा सर्वोच्च छत्रपती क्रीडा पुरस्कारही त्याने पटकाविला. मात्र, त्याउपरही प्रवीणला ‘स्पोर्टस कोट्या’तून नोकरी मिळाली नाही. त्यामुळे परिवाराचे पालनपोषण करण्यासाठी नाइलाजाने त्याला तुटपुंज्या पगारावर पेट्रोलपंपावर काम करावे लागत आहे.

चूनाभट्टी परिसरात राहणारा प्रवीण आट्यापाट्यांसोबत दर्जेदार खो-खोपटूही आहे. विपरीत परिस्थिती असूनही त्याने आट्यापाट्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर आणि खो-खोमध्ये राज्य स्तरापर्यंत झेप घेतली. जवळपास दीड दशकांच्या (१९९१ ते २००७) कारकिर्दीत प्रवीणने सबज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर गटात १५ च्या वर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली. अष्टपैलू कामगिरीने दिल्लीपासून हैदराबादपर्यंत आणि मुंबईपासून देहरादूनपर्यंत देशभरातील असंख्य मैदाने गाजविली.

छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू करतोय पेट्रोलपंपावर काम
भेदरलेल्या हरिणींसारखी वारांगनांची गत; चिमुकले दुधापासून वंचित

क्रीडा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल २००६ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते त्याचा प्रतिष्ठेचा छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या आधारावर प्रवीणने नोकरीसाठी ‘स्पोर्टस कोट्या’तून रेल्वे, बॅंक, मनपासह ठिकठिकाणी अर्ज केलेत. अधिकारी, महापौर व क्रीडामंत्र्यांचे उंबरठे झिजविले. परंतु, कुणीही दखल न घेतल्याने पोट भरण्यासाठी त्याने खासगी कामे करण्याचा निर्णय घेतला.

बारावीपर्यंत शिकलेला प्रवीण सात-आठ महिन्यांपूर्वी इलेक्‍ट्रिक, नळ फिटिंग व पेटिंगची कामे करून उदरनिर्वाह करीत होता. कधी दोनशे किंवा तीनशे, तर कधी पाचशे. कधीकधी तर एका रुपयाचीही कमाई होत नव्हती. कोरोनाकाळात काम मिळेनासे झाल्याने अखेर खरबी येथील पेट्रोलपंपावर रोजमजुरीचे काम सुरू केले.

आठ ते दहा तास मेहनत केल्यानंतर प्रवीणला जेमतेम आठ हजार रुपये मिळतात. एवढ्याशा कमाईत संसार चालविताना त्याला खूप त्रास होत आहे. पण त्याला इलाजही नसल्याचे तो म्हणतो. दहा बाय दहाच्या एका खोलीच्या घरात राहणाऱ्या ४४ वर्षीय प्रवीणला पत्नी, मुलगी व म्हातारी आई आहे. घरात तो एकटाच कमावता आहे.

छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू करतोय पेट्रोलपंपावर काम
पाण्याच्या बॉटलमुळे गेला तिघांचा जीव; ते कसं वाचा...

‘छत्रपती’ धुळखात पडून!

मुंबईत झालेल्या आकर्षक समारंभात टाळ्यांच्या कडकडाटात मुख्यमंत्र्यांनी प्रवीणचा छत्रपती पुरस्कार यथोचित सन्मान केला. या पुरस्काराने आतापर्यंत शेकडो खेळाडूंच्या घराची शान वाढविली. मात्र, प्रवीणच्या घरी ही ट्रॉफी अक्षरशः धुळखात पडून आहे. माझ्यासारख्या गरीब व्यक्‍तीला पुरस्कार नव्हे, नोकरीची खरी गरज आहे. पुरस्काराऐवजी एखादी चपराश्‍याची नोकरी दिली असती, तरीही मला अधिक आनंद झाला असता, अशा शब्दांत प्रवीणने व्यथा बोलून दाखविली.

प्रशासन घेणार काय दखल?

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये छत्रपती पुरस्कार विजेत्यांना नगर परिषदांमध्ये थेट नोकऱ्या देण्यात आल्याची माहिती आहे. त्या आधारावर नागपूरचे जिल्हाधिकारी किंवा महापौरांनी प्रवीणचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. स्वतः प्रवीणनेही ‘सकाळ’मार्फत तशी विनंती प्रशासनाकडे केली आहे. एका ‘चॅम्पियन’ खेळाडूची शासन अशाप्रकारे उपेक्षा करीत असेल तर, भविष्यात राज्यात कसे काय खेळाडू घडतील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. खेळात करिअर करण्यास इच्छूक तरुणांसाठी ही निश्‍चितच चिंतेची गोष्ट आहे.

राज्यालाही नावलौकिक मिळवून दिला. आयुष्यातील उमेदीचा काळ खेळासाठी दिला. त्या मोबदल्यात मला शासनाने ‘छत्रपती’शिवाय दुसरे काहीच दिले नाही. सदैव उपेक्षाच केली. आजच्या घडीला मला खरोखरच शासकीय नोकरीची नितांत गरज आहे. शासनाने मला न्याय द्यावा, ही एकच माझी मागणी आहे.
- प्रवीण वहाले, राष्ट्रीय आट्यापाट्या खेळाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.