मोदी है तो रिस्क है! पेट्रोल पंपावर असलेल्या मोदींच्या बॅनरमुळे पेट्रोल ओतणारा व ग्राहकांत होताहेत वाद

Preparations to remove Narendra Modis banner at petrol pumps in Nagpur
Preparations to remove Narendra Modis banner at petrol pumps in Nagpur
Updated on

नागपूर : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवरून सामान्य नागरिक संतप्त आहे. त्यातच पेट्रोलपंपवरील बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहून पेट्रोल खरेदीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या संतापात आणखी भर घालत आहे. यातूनच अनेकदा वाहनाच्या टॅंकमध्ये पेट्रोल ओतणारा व ग्राहकांत वाद होत असून, संतापाच्या उद्रेकाच्या भीतीने अनेक पेट्रोल पंपमालकांनी पंपवरील बॅनर काढण्याची तयारी सुरू केली. काही पेट्रोलपंप मालकांनी बॅनर काढूनही टाकल्याचे दिसून येत आहे.

पेट्रोल व डिझेलची दरवाढ दररोज होत असून, सामान्य नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई वाढत आहे तर पेट्रोलच्या दरवाढीमुळे अनेकांचे महिन्यांचे बजेट बिघडले आहे. शहरात ९७.५१ पैस पेट्रोलचा दर असून, पावर पेट्रोलचा दर शंभर रुपयांपेक्षाही जास्त आहे. पेट्रोल पंपवर वाहनात पेट्रोल टाकताना सामान्य नागरिकांचा जळफळाट होत आहे.

गेल्या काही दिवसांत शहरातील पंपांवर पेट्रोल भरणाऱ्यांकडून अपशब्दाचाही वापर केला जात आहे. अनेकदा सामान्य नागरिक पेट्रोल पंपवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर बघताच आक्रमक होत आहेत. त्यामुळे शहरातील काही पेट्रोलपंपचालकांनी सावध पवित्रा घेतला आहे. पेट्रोलच्या दरवाढीवरून निर्माण झालेला संताप रोखणे शक्य नाही. परंतु, संतापात भर घालणारे बॅनर सन्मानपूर्वक काढून भविष्यातील अप्रिय घटना रोखणे केव्हाही चांगलेच, असे एका पेट्रोल पंपचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

वाढत्या पेट्रोल दरामुळे नागरिकांचा संताप आता अनावर होत आहे. उद्रेकाची भीतीही नाकारता येत नाही. त्यामुळे मोदींच्या बॅनरची जोखीम कुणीही घ्यायला तयार नाही. काही पेट्रोलपंप मालकांनी हे बॅनर काढूनही ठेवले तर काहींनी बॅनर काढून नाराजी ओढवून घेण्याऐवजी त्यापुढे मोठी झाडे कुंडीसह उभी केली आहे.

नागरिकांची थट्टा करण्याचाच प्रकार
दररोज पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. वस्तूंच्या किमती वाढल्या. पेट्रोलपंपवर वाहनात पेट्रोल टाकताना संताप तर येणारच. त्यात पंतप्रधानांचा फोटो सामान्य नागरिकांची थट्टा करण्याचाच प्रकार आहे.
- गजेंद्र लोहिया,
सामान्य नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.