५०० रुपयांची चाचणी साडेतीन हजारांत; वयासह आधार क्रमांकातही घोळ

file image
file imagecanva
Updated on

नागपूर : खासगी रुग्णालयात रुग्णांकडून एकीकडे पैशाची लुट सुरू असताना आता कोरोना चाचणीदरम्यान अहवाल पाच दिवसांनी देत, त्यातही वय आणि आधारक्रमांक चुकविला असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या अहवालाबाबतच साशंकता निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे शहरातील रामदासपेठ परिसरातील एका बड्या रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असल्याचे दिसून येते.

हेही वाचा - खुशखबर! आणखी सात कंपन्या तयार करणार 'रेमडिसिव्हीर'

कोरोनाच्या चाचणीसाठी सरकारी केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. यामुळे बरेच लोक जास्तीचे पैसे देऊन खासगीमध्ये चाचणी करुन घेतात. मात्र, खासगी रुग्णालयातही चाचणीसाठी सरकारने शुल्क निर्धारित केले आहे. मात्र, त्यातही खासगी रुग्णालयाकडून लुट केली जात असल्याचे दिसून येते. ५०० रुपयाची चाचणीसाठी रुग्णालयाकडून साडेतीन ते चार हजार रुपये आकारण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांची लुट होताना दिसून येते. याशिवाय चाचणीचा अहवालही बऱ्याच उशिरा मिळत असल्याचे दिसून येत आहे. यापैकीच एका वृद्ध महिलेने १० तारखेला या रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी आणले. त्यांच्या 'स्वॅब' घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चाचणीचा अहवाल मिळणे अपेक्षित होते. मात्र, या रुग्णाला तब्बल पाच दिवसांनी अहवाल देण्यात आला. त्यात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने उपचारास उशीर झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अहवाल देताना, त्यात रुग्णाचा आधार क्रमांक चुकीचा टाकण्यात आला आहे. ७० पेक्षा अधिक वय असलेल्या रुग्णाचे वय ४१ वर्ष दाखविण्यात आले आहे. त्यामुळे अहवाल खरा की खोटा याबाबत साशंकता निर्माण होत असून या रुग्णालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()