वटपौर्णिमेच्या दोन दिवसांपूर्वीच कडुनिंबाला राष्ट्रीय वृक्षाचा प्रस्ताव

वटपौर्णिमेच्या दोन दिवसांपूर्वीच कडुनिंबाला राष्ट्रीय वृक्षाचा प्रस्ताव
Updated on

नागपूर : वडाचे झाड देशाचे राष्ट्रीय प्रतीक (The Wada tree is the national symbols of the country) मानले जाते. हे झाड पूजनीय असून घराघरात गुरुवारी वटपौर्णिमा (Vatpournima at Thursday) साजरी करण्याचे बेत आखले जात आहे. वटपौर्णिमेच्या दोन दिवसांपूर्वी मंगळवारी महापालिका सभागृहात कडुनिंबाच्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष घोषित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. (Proposal-of-National-Tree-to-Neem)

सात जन्म हाच पती मिळावा, यासाठी महिला वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. हे झाड पवित्र असून पूजनीय आहे. त्यामुळे वडाच्या झाडाला राष्ट्रीय वृक्ष घोषित करण्यात आले. दोन दिवसानंतर गुरुवारी वटपौर्णिमा आहे. घराघरात महिला हा उत्सव साजरा करण्याची तयारी करीत आहे. परंतु, आज महापालिकेच्या सभेत कडुनिंबाचे झाड अनेक औषधीगुणांसह सावलीही देत असल्याने त्यास राष्ट्रीय वृक्ष घोषित करावे, असा ठराव सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी मांडले. महापौर दयाशंकर तिवारी यांनी हा ठराव मंजूर केला. त्यांनी महापालिकेचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवावा, अशा सूचना प्रशासनाला केल्या.

वटपौर्णिमेच्या दोन दिवसांपूर्वीच कडुनिंबाला राष्ट्रीय वृक्षाचा प्रस्ताव
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

सुरक्षा रक्षक कंत्राटाची चौकशी

महानगरपालिकेची सुरक्षा मे. किशोर एजन्सी आणि मे. सुपर सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्याकडील पोलिस परवान्याची मुदत संपल्यानंतरही त्यांचे कंत्राट कसे काय सुरू होते, या नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी आणि आयुक्तांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून सदस्यांना लेखी उत्तर द्यावे, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी महासभेत दिले.

नदीलगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी बैठक

शहरातील विविध नद्यांच्या परिसरात अतिक्रमण आहे. चारचाकी विक्री करणाऱ्यांची संख्या यात मोठी आहे. येत्या शुक्रवारी मनपा अधिकारी, पोलिस वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले. बैठकीत सुमारे २० ते ३० दिवस अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम सुरू करावी, अशी सूचनाही महापौर तिवारी यांनी केली.

वटपौर्णिमेच्या दोन दिवसांपूर्वीच कडुनिंबाला राष्ट्रीय वृक्षाचा प्रस्ताव
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी

स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील एकीकृत घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाद्वारे २६८.६८ कोटींच्या सुधारित सविस्तर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागातर्फे महासभेसमोर ठेवण्यात आली. या प्रकल्पाला महासभेनेही मंजुरी दिली. सुरवातीला हा प्रकल्प ३०८ कोटींचा तयार करण्यात आला होता.

(Proposal-of-National-Tree-to-Neem)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()