नागपूर - आलिशान हॉटेलमध्ये एका दांपत्याकडून देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग (एसएसबी)च्या पथकाला माहिती मिळताच हॉटेलवर धाड मारून भंडाफोड केला गेला. संचालक पती-पत्नीला पकडून सदर पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्का हेडाऊ (२८) आणि इंद्रजित हेडाऊ (३६) रा. खडकाडी मोहल्ला, गोळीबार चौक अशी या दलालांची नावे आहेत.
पैशाचे आमिष दाखवून दलाल पती-पत्नी देहविक्री करण्यास मुलींना बाध्य करीत होते. हॉटेलमध्ये खोली आणि ग्राहकही उपलब्ध करून देत होते. पोलिस निरीक्षक कविता ईसारकर यांनी माहिती घेतली असता सदर परिसरातील हॉटेल दुआमध्ये हा प्रकार सुरू असल्याचे समजले.
दरम्यान पथकाने सापळा रचला आणि एका पंटर ग्राहकाला पाठविले. पंटर ग्राहकाने सौदा पक्का करताच त्याने पथकाला ईशारा केला. पथकाने घटनास्थळी धाड मारून दलाल पती- पत्नीला पकडले. त्यांच्या ताब्यातून दोन पीडितांची सुटका करण्यात आली. दोन मोबाईल, रोख दहा हजार रुपये असा एकूण २८ हजार ४३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी विरुद्ध सदर ठाण्यात पीटा अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनात हवालदार सचिन बढीये, प्रकाश माथनकर, लक्ष्मण चौरे, अजय पौणिकर, समीर शेख, अश्विन मांगे आदींनी केली.
पीडितांना द्यायचे दीड ते दोन हजार
पीडित मुलगी (२५) मुळची चंद्रपूरची असून नागपुरात शिकायला आहे. परिस्थिती हलाखीची आहे. ती दाम्पत्य दलालांच्या संपर्कात आल्याने या व्यवसायाकडे वळली. तर दुसरी ३२ वर्षीय पीडित महिला नागपुरातील असून ती विवाहित आहे. आधी कॅटरिंगच्या कामाला जायची. तेथे आरोपी महिला सुद्धा कामाला होती. तेथून त्यांची ओळख झाली. पीडितांना दीड ते दोन हजार रुपये देऊन त्यांचे शोषण करायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.