नागपूर : दहीहंडी उत्सवामध्ये धोकादायक लेझर लाइटवर पोलिस आयुक्तांनी बंदीचे आदेश काढले होते. मात्र काही मंडळांनी या आदेशाला हरताळ फासला. त्यामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण आल्याचे नेत्ररोगतज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्येही लेझर लाइटचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.