Prakash Ambedkar: "चंद्रकांत पाटलांचं जाहीर अभिनंदन करतो; आंबेडकर असं का म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं आज नागपूरमध्ये महापुरुषाच्या अपमानाच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
chandrakant-patil_Prakash Ambedkar
chandrakant-patil_Prakash Ambedkar
Updated on

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं आज नागपूरमध्ये महापुरुषाच्या अपमानाच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोर्चेकरांना संबोधित करताना ते बोलत होते. (Publicly congratulates Chandrakant Patil says Prakash Ambedkar)

chandrakant-patil_Prakash Ambedkar
Prakash Ambedkar: आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुम्हाला रस्त्यावरच झोपावं लागेल; आंबेडकरांचा इशारा

आंबेडकर म्हणाले, "सत्ताही चोरांची सत्ता झालेली आहे. त्यामुळं बदल करा आणि चांगलं राज्य आणा हा संदेश दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचं आम्ही जाहीर अभिनंदन करत आहोत. या सरकारचं मला काही खर दिसत नाही. दुर्देव असं की, काही व्यक्ती आपल्यातून निघून गेल्या, त्या कशा गेल्या यावरुन वाद सुरु आहे. आपण बघत असाल की त्या व्यक्तींच्या नावावरुन राजकारण सुरु झालं आहे. दुर्दैवानं केंद्र शासनच्या संस्था त्यात तपास करत आहे, हे सरकारही काय खरं काय खोट हे सांगायला तयार नाही"

chandrakant-patil_Prakash Ambedkar
Russian YouTubers: बापरे! 60 मजली टॉवरवर जीवघेणी स्टंटबाजी; दोन रशियनं युट्यूबर्सना अटक

सत्ता म्हणजे अमरपट्टा नाही

कुठलंही प्रामाणिक सरकार असलं ज्यामध्ये थोडीशी माणुसकी शिल्लक असेल तर त्यांनी डॉक्टरांचा आणि पोलीसांचा अहवाल समोर आणला असता तर टीव्हीवरुन सुरु असलेल्या तर्कहीन चर्चा थांबल्या असत्या. पण जिथं माणुसकीहीन लोक सत्तेत बसले आहेत. त्यांना माणसांचा जीव महत्वाचा नाही. ज्यांना आपली सत्ताच केवळ प्रिय आहे त्यांच्याबद्दल आपणच विचार करायला हवा. सत्ता येते आणि जाते तो अमरपट्टा नाही. पण आता त्याला अमरपट्टा करण्याचं काम सुरु आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

सरकार शिंदे चालवतात की फडणवीस?

"पूर्वी आंदोलन करताना सत्ताधारी चर्चेला बोलवायचे पण आत्ताचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवतात की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतात हेच कळत नाहीए. पूर्वी आम्ही फक्त मुख्यमंत्र्याकडेच जायचो आता आम्हाला एक प्रश्न दोन माणसांकडे घेऊन जावं लागतं. त्यातही उपमुख्यमंत्री हा शब्द वापरला तर तुमचं काम झालं नाही म्हणून समजा", असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.