महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान आज लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी नागपूर येथील संविधान सन्मान संमेलनासाठी उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी जातनियाय जनगणना, आरक्षण अशा वेगगळ्या मुद्द्यावर भाष्य केले.