Railway Coach Manufacturing Project : विदर्भात रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प उभारा ;अर्थसंकल्पानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रस्ताव

विदर्भात स्टील इंडस्ट्रीला वाव असल्याने रेल्वे डबे निर्मिती प्रकल्प व इतर रेल्वे सुविधांबाबतचा प्रस्ताव प्रदीप माहेश्वरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे दिला. केंद्रीय अर्थसंकल्प २४ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार आहेत.
Railway Coach Manufacturing Project
Railway Coach Manufacturing Projectsakal

नागपूर : विदर्भात स्टील इंडस्ट्रीला वाव असल्याने रेल्वे डबे निर्मिती प्रकल्प व इतर रेल्वे सुविधांबाबतचा प्रस्ताव प्रदीप माहेश्वरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्राद्वारे दिला. केंद्रीय अर्थसंकल्प २४ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन मांडणार आहेत. त्याअनुषंगाने विविध मंत्र्यांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

गडचिरोली परिसरातून लोहखनिजाचे दररोज ५-६ रॅक विविध गंतव्यस्थानांवर लोड करून रेल्वेला मोठे उत्पन्न मिळते. आता गडचिरोलीत अंदाजे १० दशलक्ष टन स्टील बनवण्याच्या क्षमतेसह प्रकल्प येत आहे. येथे भारतीय रेल्वेने नवीन कोच फॅक्टरीची योजना आखावी, जसे जवळील स्टीलचा वापर करून मोठ्या रोजगार निर्मितीचा प्रकल्प. विकसित विदर्भ क्षेत्रांतर्गत रेल्वेकडून डाऊन स्ट्रीम इंडस्ट्रीसारखे समर्थन आवश्यक आहे.

नागपूर मध्य भारतातील जलद गतीने विकसित होत असलेले महानगर आहे. नागपूरच्या १५० किमी क्षेत्रात २० हजार मेगावॅट औष्णिक वीजनिर्मितीमुळे प्रदूषण वाढले. त्यातून आरोग्य आणि अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागपूरसाठी ४ ईएमयू (इलेक्ट्रो मॅग्नेटिक युनिट्स) मुंबई लोकलसारख्या ट्रेनचा विचार करणे आवश्यक आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील. सोबतच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल.

मध्य भारतातील नागपूर येथे दोन विभागीय कार्यालये कार्यरत आहेत. परस्पर सामंजस्याने दुर्ग येथे संपलेल्या सर्व गाड्या नागपूरपर्यंत वाढवता येतील आणि नागपूरला संपलेल्या सर्व गाड्या दुर्गपर्यंत वाढवता येतील. चेन्नई-बंगळूर ते वाराणसी प्रयागराज मार्गावर वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी या मार्गाची प्रचंड क्षमता आणि मदत प्रवाशांना होऊ शकते, असे माहेश्वरी यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com