नागपूर : रामझुला मर्सिडीज कार अपघात प्रकरणाचा तपास तहसील पोलिसांनी समाधानकारक केला नाही. या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सत्यापूर्ण तपास होणे गरजेचे आहे. तसेच, पक्षकारांना न्याय देण्यासह समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी या प्रकरणाचे हस्तांतरण करणे गरजेचे असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले.