Shivgarjana Dhol Tasha Pathak at Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन पंधरा दिवसांवर आले आहे. त्यामुळे देशभर उत्साहाचे वातावरण आहे. शहरातदेखील ठिकठिकाणी यानिमित्त नियोजन सुरू आहे. या शुभपर्वावर नागपूरकरांसाठी गौरवाची बाब म्हणजे शहरातील शिवगर्जना ढोलताशा पथकाला या उत्सव काळात २४ व २५ जानेवारी रोजी अयोध्येत रामलला मंदिर परिसरात ढोलताशा वादनाचा मान मिळाला आहे.
या कार्यासाठी शहरातील १११ वादक तरुण-तरुणी २३ जानेवारीला नागपूर येथून अयोध्येकरिता रवाना होणार आहेत. यामध्ये ४० ते ५० ढोल, २० ते २५ ताशे, २१ ध्वज आणि १० झांज पथकांचा समावेश आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी शिवगर्जना ढोलताशा पथकाला निमंत्रण पाठविले आहे. यानुसार २४ जानेवारी रोजी होणाऱ्या शंखनादादरम्यान ढोलताशा पथक सादरीकरण करीत सेवा देईल. तर २५ जानेवारी रोजी घोषवादन होईल.
यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्यात दीपोत्सवानिमित्त शंभर वादकांनी येथे वादनाची सेवा दिली होती. अयोध्येमध्ये नागपूरकर पथकाचा नाद घुमल्यानंतर, या उत्सव काळात पुन्हा एकदा शिवगर्जना ढोलताशा पथकाला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे शहराच्या पदरातदेखील यारुपाने प्रभू श्रीरामाचे कौतुकरुपी आशीर्वाद मिळणार असल्याचे भावना व्यक्त होत आहे. यानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया शिवगर्जनाचे प्रमुख प्रतीक टेटे यांनी व्यक्त केली.
विदर्भ प्रांततर्फे महिनाभर अन्नछत्र
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त यवतमाळच्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमार्फत व नागपुरातील शिव शक्ती मंडळाद्वारे संपूर्ण महिनाभर अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र चालवण्यात येणार आहे. या निमित्त यवतमाळ, नागपुरातून स्वयंपाकी व अन्य सहयोगी असे जवळपास शंभर सेवाधारी कार्यकर्ते महिनाभर पुरेल एवढी अन्न सामग्री घेऊन बुधवारपर्यंत (ता. १०) अयोध्येला पोहोचणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.