Nagpur Ram Jhula Car Accident : रितू मालूचा अटकपूर्व जामीन नागपूर खंडपीठाने फेटाळला; तपासादरम्यान पोलिसांची दिशाभूल

Nagpur Accident : रितूने तपासादरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर केलाच; परंतु, तपासादरम्यान यंत्रणेला सहकार्यही केले नाही, असे निरीक्षण रितूच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देताना उच्च न्यायालयाने नोंदविले.
Nagpur Ram Jhula Car Accident
Nagpur Ram Jhula Car AccidentSakal
Updated on

Nagpur : रामझुल्यावरून मद्यधुंद अवस्थेत भरधाव मर्सिडीज कार चालवत दोघांना चिरडल्याचा आरोप असलेली रितिका ऊर्फ ​​रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला.

रितूने तपासादरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तर केलाच; परंतु, तपासादरम्यान यंत्रणेला सहकार्यही केले नाही, असे निरीक्षण रितूच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निकाल देताना उच्च न्यायालयाने नोंदविले. तसेच अशा परिस्थितीत रितूला अटकपूर्व जामीन देत दिलासा मिळण्यास पात्र नाही, असे नमूद करीत तिला दणका दिला.

या प्रकरणावर न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके यांच्या समक्ष सुनावणी झाली. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. रितू मालू व माधुरी शिशिर सारडा (वय ३७, रा. वर्धमाननगर) या दोघी सीपी क्लबमध्ये गेल्या. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले.

Nagpur Ram Jhula Car Accident
Nagpur Zika Virus Update : झिकाचा धोका ओळखून नागपूर शहरात अलर्ट; डासांची उपत्तीस्थाने नष्ट करण्याच्या सूचना

त्यानंतर मर्सिडिजने (एमएच ४९ : एएस ६१११) दोघी वर्धमाननगरकडे जायला निघाल्या. रामझुल्यावर रितूने कारचा वेग वाढविला व मोपेडला (एमएच ३७ : क्यू २९४८) जोरदार धडक दिली. यात मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (वय ३४, रा. नालसाहब चौक, मोमिनपुरा) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (वय ३२, रा. अवस्थी चौक, जाफरनगर) यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तहसील पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून रितूला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली. पुढे तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अटक टाळण्यासाठी रितूने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्याला न्यायालयाने अंतरिम मंजुरी दिली होती. तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

Nagpur Ram Jhula Car Accident
Nagpur : रुग्णालयांचे अनधिकृत बांधकाम अधिकाऱ्यांना दिसत नाही का? रामदासपेठेतील कारवाईवर संशय, नागपूर खंडपीठ

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत १९ जून रोजी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. मालूतर्फे वरिष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर, ॲड. प्रकाश जयस्वाल यांनी व शासनातर्फे मुख्य सरकारी वकील ॲड. देवेन चव्हाण यांनी बाजू मांडली.

‘ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह तिच्या बुद्धीचा आरसा’

विवेकी व्यक्ती दारू पिऊन कार चालविणार नाही. प्रथमदर्शनी सीसीटीव्ही फुटेज पाहता रितूने कार चालवली त्यामुळे दोन निष्पाप मुलांचा जीव गेल्याचे दिसून येते. याला तिची बुद्धी जबाबदार आहे, असे म्हणायला हवे.

दारू पिऊन स्टेअरिंगवर बसत वेगात आणि बेफिकिरीने गाडी चालविणे (ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह), याचे ज्ञान तिला होते, असे म्हणता येईल. भारतीय दंड संहितेनुसार, आरोपीचे हे ज्ञान त्याच्या मनाची स्थिती दर्शविते करते, असे निरीक्षण न्यायालयाने निकालात नोंदवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.