Rashmi Shukla Visited Gadchiroli Naxalite Area: माओवाद्यांच्या प्रभावामुळे हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे. परंतु, आता नवीन पोलिस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे येथील नागरिक भयमुक्त होऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील.
पोलिस दादालोरा खिडकी सारख्या उपक्रमातून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात येथील आदिवासी बांधवांच्या मदतीनेच आम्ही माओवाद संपवू, असे मत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केले.
रश्मी शुक्ला या शनिवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. प्रारंभी त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय येथील शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या अतिसंवेदनशील भागातील वांगेतुरी चौकीला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. (Latest Marathi News)
यानंतर महाजनजागरण मेळाव्यात नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड व इतर शासकीय कागदपत्रे तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, क्रिकेट किट साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांशी त्यांनी संवाद साधताना त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून, जनतेने माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन केले.
या दौऱ्यात त्यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पोलिस मदत केंद्र सुरजागड येथील पोलिस अंमलदार निवासस्थानाचे तसेच पोलिस अंमलदार भोजन कक्षाचे उद्घाटन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० पथकाचा सरकारला अभिमान असून, पथकातील जवानांनी माओवादाविरुद्धच्या अखेरच्या लढाईवर लक्ष केंद्रित करायला हवे. (Latest Marathi News)
दिवसभर चाललेल्या या दौऱ्यात राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, विशेष पोलिस महानिरीक्षक तसेच नक्षलविरोधी अभियानाचे प्रमख संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्रचे पोलिस उपमहानिरिक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीन देशमुख उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.