Republic Day 2023 : इंजिनिअरिंग सोडून हॉटेल सुरू केलं, आज त्याची तिरंगी मफिन इडली धमाल उडवत आहे

हिरवी, नारंगी आणि पांढऱ्या रंगातील ही इडली खवय्यांच्या पसंतीस उतरू लागली आहे
Republic Day 2023
Republic Day 2023esakal
Updated on

Republic Day 2023 Special Idli : प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय कार्यालयासह सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. मिठाईच्या दुकानांवरही तिरंगी मिठाईला ऑर्डर मिळत आहेत. हेच औचित्य साधून युवा व्यावसायिक श्यामल मेश्राम याने तिरंगा मफीन इडली तयार केली. हिरवी, नारंगी आणि पांढऱ्या रंगातील ही इडली खवय्यांच्या पसंतीस उतरू लागली आहे.

श्यामल मेश्राम या युवा व्यावसायिकाने पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले. काही काळ नोकरी केली. मात्र, स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नसल्याने नोकरीला रामराम ठोकला. कोरोनापूर्वी हॉटेल सुरू केले. मात्र, त्यात पाय रोवण्यापूर्वीच अपयश आले. कोरोना प्रादूर्भावामुळे दुसऱ्याही व्यवसायात उभारी मिळू शकली नाही.

Republic Day 2023
Republic Day Special Recipe : खास प्रजासत्ताकदिनी नाश्त्याला बनवा तिरंगा पोहे

अपयशातून खचून न जाता खाद्य व्यवसायात पाय रोवण्याची त्याची धडपड सुरू होती. स्वतःचा फूड ब्लॉग सुरू केला. त्यातून नवनवीन खाद्य पदार्थ तयार करण्याची इच्छा जागृत झाली. आता त्रिमूर्तीनगर येथील भांगे लॉनजवळ प्रबोध प्रसादम् नावाने छोटेखानी हॉटेल सुरू केले. त्यात तो नवनवीन प्रयोग करीत असतो. (Food)

चिमुकल्यांसाठी नवनवे पदार्थ

लहान मुले बिट, गांजरासह अनेक भाज्या खाण्यास इच्छुक नसतात. अशासाठी पिंक दोसा हा नवीन खाद्य पदार्थ श्यामलने तयार केला. त्यात आरोग्यासाठी पोषक तत्त्व असलेले बीट, गाजरासह इतरही डाळींचा समावेश केला आहे. हा दोसा लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. (Republic Day)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()